नुसरत ......
मेजर विक्की तुम्ही आणि आता ??? नुसरत यांनी दरवाजा उघडला नाही तर मला हा प्रश्न विचारला . मला थोडे अवघड वाटले , तरी सुध्दा थोडी हिंमत करून मी म्हंटले , का बरं मी आलेला आपल्याला आवडले नाही का ??? माझ्या शब्दात एका प्रकारे वेदना होत्या आणि कदाचित त्या नुसरत यांना कळल्या असाव्यात . नाही असे नाही आहे , मात्र आता सकाळी सकाळी नऊ वाजता आणि ते सुध्दा असे वर्दी सुध्दा नाही घातलेली आहे . मला हसून त्या म्हणाल्या . अहो आज सुट्टी आहे आणि म्हटले रेहान याला भेटून सुध्दा यावेत आणि सोबत ....
मी मध्येच माझे शब्द आवरते घेतले , मला वाटते माझ्या भावना त्यांना कळल्या असाव्यात . त्यामुळे थोडे का असे ना हसू त्यांच्या चेहऱ्यावर सुध्दा आले होते . बरं आपण का फक्तं असे उभे राहून बोलणार आहोत का ???
मला नुसरत यांनी विचारले , अहो तुम्ही मला आत या असे कधी म्हणाल्या आहात . मी सुध्दा लगेच उत्तर दिले . त्यावर त्यानी असे काही आपला चेहरा केला की त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहण्या सारखे होते . मला तर वाटले की मी कदाचित या मधून आता कधीही बाहेर नाही पडणार आहे .आम्ही आत बसलो , आज मला घरात कोणीही दिसत नव्हते . मी आजूबाजूला कोणी दिसत आहे का , ते बघत होतो . नुसरत या किचन मध्ये गेल्या होत्या . खरंतर असे त्यांच्या घरी जाणे मला सुध्दा आवडले नव्हते , मात्र आपले मन कसे आवरू हे कळतं नव्हते . त्यामुळे मी आज असे अचानक त्यांच्या घरी आलो होतो . मी आपल्या मनात विचार करत होतो तेवढ्यात नुसरत बाहेर आल्या . आज वातावरण सुंदर आहे ना ???? मी नुसरत येताच म्हटलें . हो ना खूप दिवसांनी सूर्य दिसला आहे . मला आपल्या त्याचा नजरेने पाहत , त्या मला म्हणाल्या . मनात तर असे म्हणत होतो की नका बघू असे , तुम्ही अश्या बघता आणि मला रात्र भर झोप नाही लागत . बरं आपण बाहेर बसुयात का ???? मी लगेच म्हणालो , या वर त्यांनी सुध्दा होकार दिला .
त्यांनी आपले गार्डन खूप छान प्रकारे सजवलेले होते . खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुल झाडे होते . त्यांनी मला चहा दिला आणि स्वतः करिता घेतला . आपल्याला साखर किती ??? एक चम्मच टाका . चहाचा कप हातात घेऊन , मी चोरून त्यांना बघत होतो . त्यांना बघून कोणीही म्हणू शकत नव्हते की या एका मुलाच्या आई आहेत ते ???? आम्ही दोघेही शांत होतो , खरंतर बोलायला सुरुवात कुठून करावी . हेच मला कळत नव्हते . बरं त्या नंतर तुम्हाला , पोलिसांनी परत बोलावले होते का ???
मी सरळ विचारले , नाही . त्या नंतर त्यांनी मला कधी बोलावले नाही . मी त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये गेली होती तर ते मला म्हणाले की आम्हाला अगोदर का बरे नाही सांगितली की तुमची ओळख ही आर्मी ऑफिसर यांच्या सोबत आहे . खरतर मी तुमचे आभार मानायला तुम्हाला कॉल करणार होती मात्र कामात विसरून गेले . नुसरत यांनी एका वाक्यात पूर्ण घटना क्रम मला सांगितला . बरं मग तुम्ही माझ्या मेसेज ला उत्तर का नाही दिले ??? सरळ विचारले , त्यावर त्या थोड्या उदास झाल्या . मेजर विक्की आपण माझी मदत केली त्याबद्दल धन्यवाद आपले मात्र ......
त्या पुढे काही नाही बोलल्या , मी त्यांना लगेच म्हणालो मात्र काय ???
असे कोण्या अनोळखी व्यक्तीशी बोलताना मला कसे तरी होते . आता माझे पती ह्यात नाही आहेत , त्यामुळे दुनिया मला तसेही वाईट नजरेने बघत असते . कोणाला काय हवे असते तर कोणाला काय . त्यांच्या वाईट नजरा मला बरोबर ओळखू येतात . त्यामुळे मी कुणावर विश्वास नाही ठेवत असते . हे बोलताना त्या खाली बघत होत्या . त्यांनी इतके म्हटले आणि मला जे कळायचे होते ते लगेच समजून आले . मी लगेच आपला चहा संपिवला आणि नुसरत यांना म्हणालो . बरं येतो मी .....
मी मागे वळून सुध्दा नाही बघितले की त्या मला बघत आहेत की नाही . जर त्यांना माझ्यावर विश्वास नाही तर मला असे त्यांच्या सोबत बोलण्याचा अधिकार नाही आहे . मला आपली चूक कळून आली होती . त्यांना वाटतं होते की , मला फक्त ????
नाही नुसरत प्रत्येक माणूस हा त्या विचाराचा नसतो , तुम्ही चुकतं आहात . खरंतर मला हे त्यांना सांगायचे होते . मात्र मी न थांबता सरळ आपल्या कॅम्प मध्ये परत आलो .