नुसरत भाग :- २७

422 0 0
                                    

मला घरी येऊन आज १२ दिवस झाले होते , कसं आहे ना घरी असलो की दिवस कसें जातात काही कळतं सुद्धा नाही . मी १६ दिवसांची सुट्टी घेतली होती . आज सकाळी नुसरत ने Msg करून मला आठवण करून दिली की मेजर आज १२ दिवस झाले आहेत आपल्याला जाऊन . आज बाहेर काहीतर रोड च कन्स्ट्रक्शन सुरू होतो . गेल्या महिन्यात आई सांगत होती की विक्की आपल्या घरा समोरील रोड च दुरस्ती सुरू आहे आणि आज परत आवाज येत होता . मी बाहेर जाऊन बघितलं तर ते लोक रोड मध्ये पाईप लाईन टाकत होते . हे काम अगोदर केलं असते तर बरं नव्हते का ?  माझ्या बाजूला उभे असलेले काका त्यांच्या ठेकेदार ला म्हणाले . अरे साहब हम भी क्या करे , हमें ऊपर से ऑर्डर मिलते हैं । मी मनात म्हटलं, बरं आहे असेच सुरू ठेवा म्हणणे देश प्रगती करेल आणि घरात परत आलो .
मोबाईल हातात घेतला तर नुसरत ने गुड मॉर्निंग msg केला होताच . मी लगेच तिला रिप्लाय दिला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम गेलो . सकाळी सकाळी रेहान चि शाळेत जाण्याची घाई असते आणि त्यामुळे ती लवकर उठत असे . साधारण सात वाजत आले होते बहुतेक रेहान शाळेत गेला असेल , असं काही तरी मी आपल्या मनात पुटपुटले आणि नुसरत ला कॉल केला . अरे आज सकाळी सकाळी कशी काय आठवण आली ? नुसरत नेहमी प्रमाणे हसत मला म्हणाली . त्याच कसं आहे ना , काही लोकांचा आवाज ऐकला ना की दिवस खूप छान जातो म्हणतात . मी सुद्धा लगेच तिला प्रती उत्तर दिलं .
हो का बरं बरं तर मेजर आणखी काही ! फक्त आवाज की आणखी सुद्धा काही असते . नुसरत नी अगदी हळू आवाजात विचारले , तसें तर खूप काही असते बट आता फक्तं आवाजावर काम चालवावे लागतं आहे . फोन वर आणखी सुद्धा काही करता येत असते का ??? नाही म्हणजे मी बाई आपले असेच विचारत आहे . नुसरत ने मारलेला टोला मी बरोबर ओळखला .
बेटा , तेरे बाबू जी का चष्मा मिला क्या ? नुसरत सासू मागून आवाज दिला आणि काही न बोलता मॅडम ने सरळ फोन बंद केला . या मुली ना , मी सांगतो तुम्हाला . बरं असूद्या .
मी फोन मधिल वॉलपेपर बघत म्हणालो आणि रूम मधून बाहेर आलो .

विक्की अरे मला थोड काम होत बँक मधे येत आहेस का तू सोबत की मी जाऊ ! बाबा आपले डोळे पेपर मधून बाहेर काढत म्हणाले , हो येतो ना तसेही मला गाडी मधे थोडे ऑईल चेंज करायचं होत . विक्की हे घे मी खास शिरा बनवला आहे , बाबा नी बरं म्हणायच्या आता माझ्या हातात बशी होती . आणि काय हो , काय काम आहे त्या बँकेत सारखं बाई ते पासबुक मध्ये एंट्री करून आणतात . काही लोन बिन तर नाही घेतं आहेत ना ! आई अश्या काही सुरात म्हणाली ना काय सांगू मी एकटक बाबा कडे पाहत होतो की आता काय उत्तर देणार आहेत . हे बाई तुला नाही कळणार ग , घरी बसून कंटाळा येतो तर म्हंटले बँक मधून यावे आणि इंगळे नाही का माझ्या मित्राचा मामे भाऊ तो म्हणे आता याच शाखेत आला आहे . काल भेटला होता तर सांगत होता , म्हंटले थोडी ओळख ही होईल आणि तसे ही हे SBI वाले खूप आळशी माणसं आहेत . सारे गाव जेवून जाईल आणि तरी पण यांचा काही लंच ब्रेक समाप्त होत नाही . बाबा अगदी जोरात हसून म्हणाले , आई मात्र आपले काम करायला किचन मध्ये परत गेली . मी बाबांना साथ द्यावी त्यांचा विनोदावर म्हणुन थोड खोटं हसून दिले .

धन्यवाद....

नुसरत Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang