नुसरत ......
मी कॅम्प मध्ये परत तर आलो होतो मात्र माझे मन हे त्या कॉफी शॉप मध्ये कुठे तरी राहिले होते . आज कळत न कळत आम्ही दोघांनी आम्हला झालेल्या प्रेमाची कबुली दिली होती . नुसरत परत जात असताना तिचे ते शब्द माझ्या हृदयात खूप खोल रुतले गेले . मला वाटत होते की माझे प्रेम हे एक तर्फी आहे , मात्र नुसरत ने जातांना . तिचे सुध्दा माझ्यावर प्रेम आहे , हे सिद्ध करून दाखवले होते . तिचे माझ्यावर प्रेम आहे , याची पूर्ण खात्री पटली होती .
मी माझा फोन बघितला तर मला नुसरत चां आलेला एक मॅसेज दिसला . मी पोहचले आणि तुम्ही ??? मी लगेच रिप्लाय दिला आणि मी पण पोहचलो . काही वेळ मी तसाच मोबाईल हातात घेऊन तिच्या प्रती उत्तराची वाट बघत बसलो . शेवटी तब्बल पाच मिनिटांनी तिचा रिप्लाय आला . आपण रात्री बोलुयात का ???
मी हो म्हणालो आणि आपल्या कामात व्यस्त झालो , तसेही आज माझी रात्र पाळी होती . आता सायंकाळचे सात वाजले होते आणि मला शिफ्ट वर रात्री नऊ वाजता जायचे होते . मी लगेच तयार होऊन , मेस मध्ये जेवण करायला गेलो .ओर मेजर क्या हालचाल हैं , मी दिसताच मला दिनकर काका यांनी हाक मारली . अहो काही नाही काका , सारे काही मजेत आहे . तुम्ही सांगा काय म्हणते तुमची तब्बेत ???? हमारा क्या जनाब हम तो मजे में ही रहते हैं . एक आहे काका नेहमी हसत उत्तर देत असतात . ते असतात ना काही लोक जे नेहमी हसत राहतात . हे काका त्यांच्या पैक्की होते . मग आज काही स्पेशल ??? मी सुध्दा हसत म्हणालो , जी आज पालक पनीर की सब्जी हैं . मी माझी एक प्लेट घेतली आणि जेवण सुरू केले . आज मेस मध्ये गर्दी थोडी जास्त होती , ही बाब माझ्या लगेच लक्ष्यात आली . हो ही वेळ असतेच तसेही जेवण करायची .
मी माझ्या नेहमीच्या ठिकाणी बसून पहारा देत होतो आणि सोबत मोबाईल फोन कडे सुध्दा लक्ष्य देऊन होतो . होऊ शकते की नुसरत हीचा एकदा मॅसेज येईल . आज मला काहीतरी तिच्या सोबत बोलायचे होते , मात्र काय तर हे फक्तं माझ्या मनाला माहीत होते . मी असेच माझ्या विचारात गुंतलो होतो आणि तेवढ्यात माझा फोन वाजला . मी बघितले तर माझ्या बालपणी चां मित्र अजय शिरसाट हा होता . त्याच्या सोबत जवळपास वीस एक मिनिट मी बोलत बसलो . त्याचा फोन ठेवल्या नंतर लगेच मला नुसरत हीचा कॉल आला .
मी हॅलो म्हणतात , तिकडून खूप कोमल आवाजात तिने मला विचारले . तुम्ही कामात तर नाही आहात ना ??? मी लगेच नाही म्हणालो . काही वेळ असेच शांततेत गेला . मला वाटले ती काही विचारणार आणि तिला वाटले असेल की मी काही विचारणार . शेवटी मी तिला विचारले , जेवण केले का ???
नाही आज मला उपवास होता आणि तुम्ही ??? नाही आज तुला उपवास होता ना त्यामुळे मी सुध्दा नाही केले जेवण , मी हसत तिला विचारले . तर त्यावर ती हसत मला म्हणाली , नाही ना आज देवाने आपल्या दोघांना जेवण नाही करायचे असे सांगितले आहे .
मी लगेच तिला विचारले , मग देवाला हे सुध्दा विचार की आपण दोघे हे नेहमी करिता कधी एकत्र येणार आहोत . मी असे म्हणताच , नुसरत लगेच मला म्हणाली . त्याचे काय आहे ना , देव म्हणत आहे की तुम्हाला एकत्र येण्याला आणखी काही वेळ आहे . मी थोडे नाराज होत म्हणालो , अग पण किती वेळ आहे .
हसत नुसरत परत मला म्हणाली , ते नाही देवाने सांगितले आहे . देव मला म्हणत होता की तुझी इच्छा जेव्हा होईल , तेव्हा तुम्ही दोघे एकत्र याल . मग मी परत तिला म्हणालो , हो का मॅडम ???माझ्या मॅडम म्हणणें कदाचित नुसरत हिला आवडले असावे . त्यामुळे ती मला हलक्या रागाने म्हणाली , अहो मला आता पासून मॅडम नका म्हणू ना आणखी वेळ आहे त्या करिता . मी सांगेन ना अगदी त्या दिवशी मला तुम्ही मॅडम म्हणू शकता . तो पर्यंत मला तुम्ही नुसरत या नावाने हाक मारायची , समजले का ???
मी हसत तिला हो म्हणालो आणि लगेच म्हटले , मग मी तुला काही टोपण नावाने हाक मारली तर चालेल का ??? त्यावर नुसरत मला म्हणाली , नाही म्हणजे नाही ......आम्ही तब्बल तीन तास बोलत बसलो . या नंतर रेहान झोपेतून जागी झाला आणि नुसरत ने फोन ठेवला . मला तिला विचारायचे होते की आपण लग्न कधी करणार आहेत . मात्र मला असे वाटते की मला तिला आणखी वेळ द्यावा लागेल .
धन्यवाद......