खरच नाही ओळखले तू , काय माणूस आहेस राव तू ना !!!
मी मोबाईल उघडुन बघीतले तर परत त्या Ortic girl या नावाने अकाऊंट आणि स्वतःला प्राजक्ता म्हणाऱ्या मुलीचा मेसेज आला होता . मी बघितलं आणि रिप्लाय केला ते बाई अग नाही ओळखले राव मी असा मेसेज नाही करत तर लगेच मला व्हिडिओ कॉल आला तिचा बरं होते की हेडफोन सोबत होतें . मी लगेच कानात घातलं आणि accept केला . Guys focus on your work , we are lossing client . फोन मध्ये कुणी तरी जोर जोरात हे वाक्य वापरत होतं . मात्र त्या Ortic गर्ल चा चेहरा काही दिसत नव्हता . मी दोन मिनट असेच ते भाषण ऐकले आणि नाईलाजाने फोन कट केला . तेव्हड्यात बाबा त्या व्यक्तीला भेटून बाहेर आले . चल विक्की जाऊयात झालं आपल काम , मी मनात विचार करत म्हंटले. आपले काम अरे मला हे सुद्धा नाही माहित आहे की काम काय आहे आणि हे सरळ म्हणत आहेत की झाले आपले काम , बरं आहे भाऊ बाबांचं . मी बाईक ला सेल्फ मारला आणि आम्ही सरळ फुले रोड वरून घरी येण्याकरीता निघालो . बाबा थोड विचार करून मला म्हणाले , अरे मला ना तुला काही सांगायचं होत विक्की . मी गाडीचा वेग थोडा कमी केला . म्हणजे तो अगोदर ही कमीच होता म्हणावे . तर माझा मित्र आहे एक , जुना वर्ग मित्र आहे . त्याचा मुलाला एक लहान बिसनेस सुरू करायचा आहे आणि त्या करिता त्याला थोडी आर्थिक मदत म्हणुन मी माझ्या नावाने त्याला बँक मधून लोन काढून देत आहे . बाबांनी एका वाक्यात सारे काही सांगून दिलं . मी फक्त एवढे म्हणालो , चांगले आहे आणि मी गाडी चालविण्यात लक्ष वेधून दिले .
आई मला ना भूक लागली आहे यार जाम , काही तरी दे !!!
तू एक दहा मिनट थांब मी तुला लगेच उपमा करून देते . असे म्हणत आई किचन मध्ये गेली आणि मी आपल फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो . मी आपला चेहरा पुसत होता आणि अचानक परत त्या Ortic गर्ल चा Instagram मध्ये व्हिडिओ कॉल आला . मी एक मिनिट विचार केला आणि कॉल कट केला . लगेच परत तिने कॉल केला मी नाईलाज म्हणून शेवटी कॉल घेतला . प्राजक्ता तू मी थोड आश्चर्यचकित होत म्हणालो , अरे काय यार आज सकाळ पासून गेम घेतं आहेस .
अरे मेजर लगेच ओळखले हो आमच्या सारख्या गरीब लोकांना , प्राजक्ता हसत मला म्हणाली . कुणी मिळालं नाही का आज म्हणून मला त्रास देत होती आणि हो ग काय ते दुपारी कॉल वर काय ऐकवत होतीस . मी हेडफोन नव्हते लावले आणि बाई चा आवाज म्हणजे बरेच बरं होते . बेटा तू मला म्हटले होते ना आयटी वाले मजेत असतात तर त्या करिता मी तुला माझी टीम मीटिंग मधे कॉल केला होता आणि हो आता कळलं ना कसे असते तर . प्राजक्ता ने एका दमात मला सार काही बोलून दिलं . अरे हो असते तुम्हाला सुद्धा थोड फार टेन्शन , मी हसत तीला उत्तर दिलं . एक गोष्ट सांग हे इतक्या दिवसांनी तुला माझी आठवण कसे काय आली !!!
मी थोड नाराज होण्याचं भाव आपल्या चेऱ्यावर आणत तीला विचारलं . ये ये थांब तुझी आठवण मला आली आणि म्हणून मी स्वतः तुला मेसज केला आणि तुझ काय रे , घरी आहेस ना मग तू नाही का करायचा मेसेज मला . आता प्राजक्ता अगदी रागात मला विचारत होती . अरे तसे नाही आहे भाऊ , मला आली होती बट म्हतले मुलगी कामात असेल . तर कशाला तिला त्रास द्यावा . मी आपली परिस्थिती सांभाळत तिला म्हणालो .आमचे दोघांचं बोलण असच इकडे तिकडे सुरू होते , मधल्या काळात आई ने मला तीन वेळा आवाज दिलं . मी काही बाहेर येत नाही आहे हे बघून आई खोली मधे आली तर तिने कॉल वर प्राजक्ता ला बघितलं आणि काय आश्चर्य वाटले तिला काय माहिती . ती काही न बोलता बाहेर आली आणि बाबांना घेऊन परत आली . मग काय त्या दोघांच्या गप्पा रंगल्या त्या तब्बल एक तास , मी बाबांच्या मागे उभे राहून सार काही ऐकत होतो . खरं सांगायचं झाले तर त्यांचे विषय म्हणजे हे बाबाचे आणि प्राजक्ता च्या आई चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केलेले कारनामे होतें . आई सुद्धा बराच वेळ प्राजक्ता बरोबर बोलत होती . मी आपले जाऊन उपमा खाऊन घेतला , नाही म्हणजे तो तसाही थंड तर अगोदर झालाच होता आणखी नको होऊ म्हणुन . शेवटीं मोबाईल मधली चार्जिंग संपली आणि तो ०६ टक्क्यांवर पोहोचला तेव्हा बाबांनी मला मोबाईल आणून दिला .
किती गोड आहे ना प्राजू , आई ने मला बघत बाबांना म्हंटले . ये आई ती प्राजक्ता वरून प्राजू कधी झाली बुवा ! ये तुला नाही कळायचं आहे का नी हो , आई ने बाबांना विचारलं . अग खरचं मला वाटलं नव्हते की इतकी बडबोली आणि मनमोकळ्या स्वभावाची असेल म्हणून , तेंव्हा कार्यक्रमात इतकं काही बोलण नाही झाल आणि आज मात्र वेळ कधी गेला ना काही सुद्धा नाही कळले .
आई आणि बाबा यांच्या मनात म्हणा की डोक्यात म्हणा काय सुरू होते याची मला काहीही कल्पना नव्हती .....
आणि हो ते सुपर कॉइन म्हणुन आहे काही तर मला सुद्धा मिळतील अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद.....