नुसरत......
अरे साक्षी तू येथे ????
मी आपल्या जागेवर बसून असेच काही कोणी ओळखीचे चेहरे दिसतात का ते बघू लागलो . हो मिळणार तर नव्हतेच मात्र असेच विनाकारण शोधू लागलो . ते असतेच आपल्या मनात सुरू की कोणी दिसेल ओळखीचा चेहरा आणि काय तसे झाले सुध्दा , मला नुसरत हीची मैत्रीण साक्षी दिसली . मी ती दिसताच तिला विचारले अग साक्षी तू आणि येथे कशी ??? मी दिसताच ती सुरवातीला थोडी ओशाळली , नंतर स्वतःला सावरत मला म्हणाली . अरे मी माझ्या एका मैत्रीण आहे , दीक्षा पटेल . तिला सोडायला आले होते . मी तिच्या कडे बघितले कारण मला तिथे कोणती दुसरी मुलगी दिसत नव्हती . मी तिला म्हटले ! अग पण मला तर कोणीही दिसत नाही आहे , मी हसत हसत म्हणालो . या वर ती लगेच मला म्हणाली . अरे ती तुझ्या दोन सिट सोडून बसली आहे . मी तिला मानाने हो का असे म्हणालो . अरे हो आणि तू कुठे जात आहेस ??? साक्षी मला म्हणाली . अग मी तर घरी जात आहे , ते थोडे काम होते घरी . आमचे बोलणे सुरु होते आणि तेवढ्यात ट्रेन सुटण्याची वेळ झाली . गाड़ी नंबर ९८७२५३ चलने को तैयार हैं , कृपया दरवाजे पर खड़े मत रहिए । भारतीय रेल हमेशा आपकी सेवा में हाजिर है । अपनी यात्रा का लुफ्त उठाए । धन्यवाद
बरं येते मी चल बाय ! असे म्हणून साक्षी गाडीच्या खाली उतरू लागली . अरे हो तुझी ओळख करून द्यायची राहिली बग दीक्षा बरोबर ??? असे म्हणून ती दीक्षा जेथे बसली आहे , तेथे बाहेरून आवाज देऊ लागली . तिने हाक देताच ती मुलगी लगेच खिडकी जवळ आली . ती आणि साक्षी माझ्याकडे बघत बोलतं होत्या . काही एक सेकंदात गाडी सुरू झाली , त्यामुळे साक्षी बाजूला झाली . मी परत आपले हेडफोन्स कानाला लावले आणि गाणे ऐकत बसलो . साधारण दहा एक मिनिटांनी मला कोणीतरी हाक दिला असा भास झाला . मी हेडफोन्स बाजूला काढले तर माझ्या बाजूला दीक्षा पटेल उभी होती . हे हाय मेजर , माझे नाव दीक्षा पटेल . आपला हात समोर करत ती मला म्हणाली . मी सुध्दा तिला माझी ओळख करून दिली . दीक्षा माझ्या समोर बसली होती कारण समोरील व्यक्ती अजून तर काही आला नव्हता . बरं मेजर मला सांगा तुम्ही मुलीनं सोबत कमी बोलत असता का ????
आणि हो थोडे लाजता का हो ???
ही मुलगी असे अचानक मला असे का विचारत आहे , हे काही मला कळत नव्हते . माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक चिन्ह तिने अचूक ओळखले . अहो इतके टेंशन नका घेऊ मेजर , मी तर मजाक करत होते . असे म्हणून दीक्षा स्वतःच हसायला सुध्दा लागली . मला काही वेळे करिता तर असे वाटले की बाई वेडी वैगरे तर नाही आहे ना ??? मी आजूबाजूला बघितले तर सारेच लोक म्हणजे तसे कमी होते मात्र तरी सुद्धा सारेच लोक हे आमच्या दोघाकडे बघू लागले . शेवटी मी माझ्या चेहऱ्यावर कसेबसे खोटं खोटं हसू आणत तिला म्हणालो , दीक्षा बस बाई आपल्या कडे सारेच लोक बघत आहेत . मी असे नाही म्हणत तर तिने आजुबाजुला पाहिले आणि मला म्हणाली , सॉरी हा माझे हसणे हे तसेच आहे ना . बरं तर मग ऐका मगाशी साक्षी ने मला तुमची ओळख करून दिली आणि तेवढ्यात ट्रेन सुरु झाली . मात्र तिने जातांना मला सांगितले की तिने तुम्हाला माझा परिचय अगोदर दिला आहे . असे असून सुध्दा , तुम्ही माझ्या कडे लक्ष्य सुध्दा देत नव्हता . मला ना तर असे वाटले की तुम्ही मुलींना भिता म्हणून की काय ??? असे म्हणून बाई परत हसायला लागल्या . हो आत्ताचे हसणे हे थोडे कमी आवाजात होते , ही वेगळी बाब आहे . बर मेजर मी एक काम करू का ??? मी माझ्या सिट वरून इकडे बसायला येऊ का ??? मला वाटले की ही मला विचारत आहे , मात्र झाले सारेच उलटे ती लगेच आपले सामान घेऊन आलो आणि सिट च्या खाली कोंबून सुध्दा दिले . मी तर फक्त तिच्या कडे बघत राहिलो .आपली जागा पक्की केल्या नंतर दीक्षा पटेल मला म्हणाली , अह तर मी तुमच्या बरोबर तीन तास प्रवास करणार आहे . त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगते की , मी खूप बडबड करते . असे म्हणत दीक्षा ने मला कोल्ड्रिक्स ची बॉटल ऑफर केली , मी सुध्दा प्रेमाने ती घेतली . येथे न घेण्याचा प्रयत्न केला असता तर पुढे ती बाई मला काय म्हणेल याचा नेम नव्हता . दीक्षा ने बोलता बोलता सांगितले की ती मास कम्युनिकेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे . सोबत तिचे मूळ गाव हे मुंबई होते मात्र तिचे वडील हे सरकारी नोकरीत असल्याने सतत त्यांची बदली होत असते . तिचा जास्तीत जास्त काळ हा जम्मू आणि काश्मीर मध्ये गेला आहे . असे ती बाई मला सांगत होती . खरंतर मी अशी मुलगी आता पर्यंत नव्हती बघितली की जी इतकी मोकळी आहे . काही एक तासात आम्ही चांगले मित्र बनलो . त्या नंतर तिने मला तिची आणि साक्षी हीची भेट कशी झाली , हे सविस्तर पने सांगितले . त्या नंतर ती नुसरत ला आता पर्यंत किती वेळा आणि कुठे कुठे भेटली याचे चांगले वर्णन करून मला सांगितले . मग ती मला आणखी काही काही आपल्या बद्दल सांगत बसली . खरं सांगू तर मला काही गोष्टी तिच्या कळत होत्या तर काही नव्हता कळतं , तरी सुद्धा तिच्या सोबत हो ला हो लावत होतो .
शेवटी दीक्षा हीचे स्टेशन आले आणि ती खाली उतरू लागली . बरं मेजर विक्की ऐक ना (( आता तुम्ही विचार करा , या तीन तासांत ही बाई मला एकेरी नावाने संबोधू लागली होती . )) तुझ्या लग्नात मला नक्की बोलवशिल बरं का . असे म्हणून तिने माझा निरोप घेतला . मी ती गेली त्या दिशेने तसेच बघत बसलो . खरंतर माझा हा पहिला अनुभव होता असे एका अनोळखी व्यक्तीशी बोलण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे इतक्या कमी वेळात आम्ही एक - मेकांच्या इतक्या जवळ आलो होतो . मित्र बनवायला सुध्दा नशीब लागते आणि मला वाटते की ते माझ्या जवळ तरी नक्की आहे .
धन्यवाद.......
प्लीज कमेंट करा , मला कळत नाही आहे की तुम्हाला ही कथा आवडत आहे की नाही . त्यामुळे आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा ....