नुसरत .......
सर मॅडम क्या ऑर्डर करू ??? वेटर ने आम्हाला प्रश्न विचारला . मी नुसरत यांना म्हणालो , सांगा काय करायचे आहे ते . त्यांनी आणि मी ऑर्डर दिली . वेटर गेला आणि मी नुसरत यांना काही विचारणार तेवढ्यात त्या स्वतः मला म्हणाल्या , बरं मला तुमची जन्म तारीख सांगत का ??? असे मध्येच मला माझी जन्म तारीख का विचारात आहेत , त्यामुळे मी थोडा बुचकळ्यात पडलो . अहो काही विशेष नाही आहे , तुम्ही अगोदर सांगा . बहुधा माझ्या चेहऱ्यावर निर्माण झालेले भाव त्यांना कळले असावे . मी आपली जन्म तारीख त्यांना सांगितली , त्यावर त्या लगेच मला म्हणाल्या . हे बघा मी तुमच्या पेक्ष्या दोन वर्षांनी लहान आहे , त्यामुळे तुम्ही मला या नंतर फक्तं नुसरत या एकेरी नावाने हाक मारायची . खरंतर मला सुध्दा थोडे नवल वाटत होते की काल या माझ्या सोबत असे वागल्या होत्या आणि आज मात्र मला एकेरी नावाने हाक मारायची असे म्हणत आहेत . मी लगेच नुसरत यांना म्हणालो , मात्र तुम्ही तर अनोळखी व्यक्तीशी बोलताना सुध्दा विचार करत असता आणि आता असे म्हणत आहात . मी हसत म्हणालो , माझे म्हणणे कदाचित त्यांना आवडले नसावे . कारण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही . मी परत त्यांच्या कडे बघितले तर नुसता या आपल्याच तंद्रीत मला जाणवल्या .
काय झाले नुसरत ??? मी म्हणत नाही तर त्या हसून मला म्हणाल्या , हे बघा शेवटी तुम्ही मला ऐकेरी नावाने हाक मारली ना ??? मला माझेच हसू आले आणि खरचं मी असे म्हंटले होते . अहो तुम्ही अचानक काहीच बोलत नव्हती , त्यामुळे मला वाटले की तुम्हाला माझा परत राग आला की काय ????
नाही मेजर , तसे काही नाही आहे . स्त्रियांच्या डोळे हे खूप पारखी असतात . त्यांना कोण आपल्या कडे कसे बघत आहे , हे बरोबर कळतं असते . मला तर तुम्ही पहिल्याच भेटी मध्ये एक चांगले पुरुष आहात , हे कळले होते मात्र तरी सुध्दा . एकाच वाक्यात नुसरत सारे काही बोलून गेली होती . मी मात्र फक्तं ऐकत बसलो . आपले बोलणे पूर्ण करून , नुसरत मी काय उत्तर देतो या कडे बघत होत्या . मी थोडे पाणी पिले आणि ग्लास खाली ठेवत म्हणालो , हे बघ मी तुला अगोदर सुध्दा म्हंटले आहे की प्रत्येक माणूस हा सारखा नसतो . दोष शोधायला गेलो तर प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष मिळेल .या नंतर तब्बल एक तास आम्ही इकडील तिकडील विषयांवर गप्पा मारल्या . त्या नंतर नुसरत घरी गेली आणि मी परत आपल्या कॅम्प मध्ये परत आलो . हो जातांना मात्र नुसता ने म्हटलेले शब्द माझ्या मनात घर करून गेले , मला तुम्ही अगोदर मिळाले असते तर ....
धन्यवाद........