मी कॉफी शॉप चा दरवाजा उघडताच समोर नेहमीच असलेला वेटर मला दिसला . त्याने खूप गोड हसून माझे स्वागत केले आणि मला बसायला सांगितले . मी आज त्याला मुद्दामून सांगितले की मला सर्वात अखेरचा टेबल हवा आहे . त्यामुळे मला कोणीही डिस्टर्ब करू नये . मला नुसरत त्यांना दुपारी एक वाजताची वेळ सांगितली होती भेटायची , कारण मधल्या काळात रेहान हा सुद्धा शाळेत गेलेला असतो आणि घरात कामे सुद्धा कमी असतात . हे त्यांनी काल रात्री बोलताना मला सांगितले होते . त्यामुळे मी याच वेळेस त्यांना भेटायला बोलावले , तसेच मागील आठवड्यापासून माझी रात्रीची शिफ्ट असल्यामुळे मला सुद्धा काही अडचण नव्हती . मी त्यांना दुपारी एक ची वेळ सांगितली तर होती मात्र मी स्वतः हजर झालो ते साडेबाराच्या दरम्यान , तसेही असं कोणीतरी सांगून गेल आहे की स्त्रियांना कधीही वाट पाहू देऊ नये . बर असो तर मी आपल्या जागेवर बसून माझ्या नेहमीच्या वेटर ला आवाज दिला आणि त्याला माझी नेहमीच ब्लॅक कॉफी सांगितली . डोक्यात तर विचारांचे थैमान माजले होते , असे नव्हते की मी नुसरत यांना असे एकटे पहिल्याच वेळी भेटत होतो . या अगोदर सुद्धा मी त्यांना असे भेटलो आहोत , मात्र आताची वेळ ही थोडी वेगळी होती . म्हणजे काय तर माझ्याकडे शब्द नाहीत किंवा मी ते शब्दात वर्णन नाही करू शकत . मी सहज आपला मोबाईल खिशातून काढला आणि बघू लागलो . तसेही आजकाल सारेच कामे हे मोबाईल मध्ये होत असतात . उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यामुळे बाहेर हलका हलका सा सूर्यप्रकाश देखील दिसत होता . असेही जम्मू-काश्मीरमधील लोकांना सूर्यप्रकाश कमी दिसत असतो त्यामुळे आज बाहेर थोडी जास्तच वर्दळ मला जाणवली होती .
सर सर आपकी कॉफी , वेटर यांनी दिलेल्या आवाजामुळे मी माझ्या विचार चक्रातून बाहेर आलो . कॉफीचा मग हातात घेतला आणि एक घोट घेऊन बघितला तर खरंच कॉफी खूप छान बनवली होती . मी माझ्या बसल्या जागेवरूनच वेटरला डोळ्यानेच इशारा करून कॉफी छान झाली आहे असे सांगितले . मी बाहेर बघत आपली कॉफी संपवत होतो , तेवढ्यात नुसरत यांचे आगमन झाले . त्या बुरखा घालून होत्या मात्र तरीसुद्धा मी त्यांना लगेच ओळखले , हे प्रेम होते की काय कुणास ठाऊक . त्या माझ्याजवळ आल्या आणि आपला बुरखा वरती केला . आज बहुतेक त्यांनी थोडासा चेहऱ्यावर मेकअप केला होता , कारण त्यांचे गाल खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत होते . मी त्यांच्या डोळ्यात बघितले तर त्यांनी आज काजळ लावलेले मला जाणवले , त्यामुळे ते डोळे अगोदरच इतके नशिले आणि आज ते खूपच जास्त दिसत होते . अरे वा तुम्ही तर मी येण्याच्या अगोदर एक कॉफी संपलेली दिसते ???? नुसरत यांनी मला प्रश्न केला . मी आपला खाली झालेला कॉफीचा मग बाजूला ठेवत त्यांना म्हणालो , तसे काही नाही आहे . मी थोडा लवकर आलो त्यामुळे मग खाली बसल्या पेक्षा एक कॉफीची ऑर्डर देऊन दिली होती .
खरंतर मी त्यांना म्हणणार होतो की आज काही विशेष आहे का??? कारण त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले ते हास्य किंवा ते भाव खरच खूपच सुंदर दिसत होते . शेवटी न राहवून मी त्यांना म्हणालो नुसरत , आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात . काही विशेष आहे का ??? मी लाजत का होईना तरी त्यांना विचारले . त्यावर त्या खूप गोड हसून मला म्हणाल्या , तसे काही विशेष तर नाही आहे . मात्र कधीकधी लोकांना खूप लहान लहान गोष्टी चा राग येत असतो ना त्यामुळे बाकी असे काही विशेष नाही आहे . त्यांनी मारलेला टोला हा काल मी त्यांच्या घरून असे न सांगता उठून आलो होतो . हा त्याकरिता आहे हे मी लगेच समजून चुकलो . त्यांचे शब्द मला खरच खूप झोंबले आणि मी त्यांना लगेच म्हणालो . कसा असते ना लोकांना सुद्धा कळायला हवे की , आपल्या शब्दांमुळे समोरील व्यक्तीच्या मनातील भावना दुखावल्या नाही पाहिजे . माझ्या या प्रति उत्तरावर त्या लगेच मला म्हणाला , असं वाटत आहे की लोकांच्या मनातील राग अजूनही शांत झालेला नाही आहे . आमच्या दोघांचे बोलणे सुरु होते , तेवढयात मध्येच वेटर आला आणि आम्ही आमचे बोलणे थांबवले .
धन्यवाद.....