नुसरत .......
कॉफी शॉप मधून आल्या नंतर मी आणि मेजर सुशांत आपल्या कामात व्यस्त झालो . तसेही मला सुट्टी होती आणि आज तीन दिवस झाले होते की आई आणि बाबा यांच्या बरोबर बोलणे झाले नव्हते . तसेही माझ्या मोठ्या बहिणीची डिलिव्हरी जवळ येत होती , त्या करिता मी या महिन्यात घरी जाणार होतो . हो अगोदर रजा मंजूर करून घेतली होती .
मी घड्याळ मध्ये बघितले तर सात वाजत आले होते . मी आई ला कॉल केला . हा आई कुठे आहेस ??? अरे मी का ती तुझ्या चुलत काकू यांच्या घरी आहे . आईने मला सांगितले , बरं बाबा कुठे आहेत ??? ते का ते असतील तुझ्या काका बरोबर गप्पा मारत . माझ्या बाबांचे आणि अनिल काका यांचे तसेही खूप चांगले नाते आहेत . हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे . बरं ऐक ना आई , आता ताईची तब्बेत कशी आहे ???? अरे ती चांगली आहे , तुझ्या जिजू नी तिला पुढील आठवड्यात आपल्या कडे यायचे सांगितले आहे रे . बरं आई काकू यांची तब्बेत कशी आहे ??? तुझ्या काकूला काय होत रे , चांगली ठणठणीत आहे ती . आई नेहमी काकू यांची मजा घेत असे , हे मला माहीत होते . बरं विक्की तू कधी येणारं आहेस रे ??? अग आई मी पुढील आठवड्यात येतो ना , त्या करिता मी सुट्टी टाकली आहे . मी आईला सांगितले , अग बाळा बघ तुला सांगायचे विसरले बघ मी !!!! काय ग आई ??? काही नाही रे ती तुझी आतो बहीण आहे ना प्राजक्ता , अरे तिचे सक्षिगंध आहे ना . कधी ठरले ग आई हे आणि ते पण इतक्या लवकर ग ??? अरे तो मुलगा आपल्या नात्यात आहे , मला वाटतं होते की तिला आपली सून करावी . मात्र त्यांना तो मुलगा आवडला , बरं जाऊ दे बाई . आपले आपले विचार असतात ते . आई सांगत होती . त्या नंतर आई बरोबर तब्बल एक तास बोलत बसलो .
आई बरोबर बोलून होत नाही ते पवन पाटील याचा कॉल आला , मग काय पवन ने योगेश पवार याला कॉल वर जोडले . मग तर जे बोलणे सुरू झाले की त्याची काही लिमिट नाही . तसेही आम्ही महिन्यातून एक किंवा दोन वेळा फोन वर बोलत असायचो . त्यामुळे कधी बोलणे सुरू झाले तर मग त्याचा काही नेम नसायचा की आमचे बोलणे हे किती तास सुरू रहायचे . आज ही अगदी तसेच सुरू झाले होते . बरं आमच्या चर्चा या काही महत्त्वाच्या नसतं आम्ही असेच चिल्लर विषयांवर तासन् तास असेच बोलतं असायचो .
मी फोन ठेवला तर बघितले की आम्ही तब्बल दोन तास बोलत बसलो होतो . मी एरफोन लावले होते , त्यामुळे मला काही फोन आला तर मला दिसत नव्हता . मी बघितले तर नुसरत चे तीन मिस कॉल होते . मी लगेच तिला कॉल केला तर तिचा नंबर बंद येत होता .
धन्यवाद......