नुसरत भाग :- ०६

1.2K 2 0
                                    

नुसरत....


मेजर विक्की आपण येथे , एका परिचित आवाजाने माझे लक्ष वेधून घेतले . मी माझा कॉफीचा कप खाली ठेवत , समोर बघितले तर रेहान ची आई होती . त्यांना असे अचानक समोर बघून मला काही वेळा करिता तर काही सुचले नाही . मात्र लगेच भानावर येत मी स्वतःला सावरले . मी त्यांना बसण्यासाठी सांगितले , त्यांनी सुध्दा खूप वेळ न लावता लगेच माझ्या समोरील खुर्चीवर बसल्या . काय घेणार आपण कॉफी की चाय ??? मी त्या खाली बसताच लगेच प्रश्न केला . नाही नको माझी आत्ताच कॉफी घेऊन झाली , त्या मला म्हणाल्या . शेवटी मी खूप आग्रह केला तेव्हा कुठे त्यांनी एक ब्लॅक कॉफी मागवली . म्हणजे मला सुध्दा ब्लॅक कॉफी आवडते त्यामुळे मी परत माझ्या करिता मागवली .

काही शनात आम्ही दोघे कॉफी पीत होतो . त्या दिवशी तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचवले , त्या बद्दल परत मी तुमची आभारी आहे . त्या मला म्हणाल्या , अहो ते माझे काम होते . त्यात आभार मानाण्यासारखे नाही आहे . मी त्यांना म्हणालो , त्या नंतर आम्ही असेच थोडे वातावरण तर कधी येथील माहोल या बद्दल बोलत बसलो . त्यांना निघायला उशीर होत होता . मी आता येथे आपण बोलुयात नंतर कधी तरी आरामात , असे म्हणत त्या आपल्या जागेवरून उठल्या . मला त्यांना काही विचारायचे होते , मात्र हिम्मत नाही झाली . शेवटी काही विचार करून , मी त्यांना आवाज दिला नुसरत . त्यांनी लगेच माझ्या कडे वळून पाहिले आणि म्हणाल्या काय झाले मेजर ???? मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हटलें , खरंतर मला हे तुम्हाला विचारायला नको . मात्र मनात तो प्रश्न मला त्रास देत आहे . या वर त्या मला हसत म्हणाल्या विचारा मेजर काय प्रश्न आहे तुमच्या मनात आणि तसेही मनात काही असते तर सरळ विचारावे . त्यांच्या या शब्दाने मला थोडा धीर आला आणि मी लगेच त्यांना म्हटले , तुम्ही मगाशी त्या वकिल यांच्या बरोबर बोलत होत्या काही प्रॉब्लेम झाला आहे का ??? माझा आवाज गंभीर होता , तसेच थोडा काळजीयुक्त स्वरात मी त्यांना विचारले . माझ्या या प्रश्नावर आपोआप त्यांचा चेहरा कोमजला .  मी लगेच त्यांची माफी मागितली आणि म्हटले जर तुम्हाला नाही सांगायचं असेल तर नका सांगू . एक वेळ त्यांनी मला बघितले आणि एक वेळ आजूबाजूला बघितले . आता पर्यंत आमचे बोलणे हे उभे राहूनच सुरू होते त्यांनी मला बसण्याचा इशारा केला .

नुसरत Donde viven las historias. Descúbrelo ahora