Hey , this is prajkta remember me !
मी बाबा बरोबर बँकेत येऊन एक तास झाला होता . बाबा काही तरी त्या त्यांच्या मित्राच्या नातेवाईक सोबत काही तरी बोलत होते , म्हणजे अहो त्यांनी मला बाहेर बस तू विक्की अशी सक्त ताकीद दिली होती . मी सुद्धा तितक्याच निमूटपणे बाहेर बाकावर बसून होतो . आजुबाजुला बघितलं तर काही जास्त गर्दी नव्हती . मी सहज आपला मोबाईल बाहेर काढला आणि इंस्टाग्राम ओपन केलं .
मी इंस्टाग्राम नवीन नवीन शिकलो होतो , खरं सांगायच झाल ना तर वेड लागले मला तर या ॲप्स चे म्हणजे किती तरी वेळा मी बिनकामाचा स्क्रोल करत राहतो . काही चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत म्हणून बरं आहे . तर मला इनबॉक्स मध्ये एक मेसेज आलेलं दिसलं . मी उघडुन बघीतले तर , Hey , this is prajkta remember me ! हा मेसेज होता . मला एक मिनिट लागला की कोण असेल ही बया नाहीतर माझा कुणी हरामी मित्र असेल , मला त्रास देण्या करिता असा मेसेज केला असेल . मी प्रोफाईल बघितलं तर लॉक होत . आता ती कन्या तर मॅसेज करून मी मोकळी झाली आणि मला पेचात पाडून दिलं . मी सुद्धा रिटर्न मेसेज केला . Hey sorry but i think you send wrong msg to wrong person , cause I don't know you . मी एक लांब लचक रिप्लाय केला आणि मोकळं झालो . बाकी बघू लागलो आहे का काही महत्वाचं ते तर , काही नाही असे पाच सहा लोकांच्या स्टोरी बघितल्या आणि परत आपले व्हॉट्सअँप बघितलं .
आज शुक्रवार होता आणि नुसरत तिच्या आई कडे तीन दिवसा करिता जाणार होती आणि तिकडे थोड नेटवर्क नाही राहणार हे तिने मला काल दुपारी कॉल वर बोलतांना सांगितले . त्यामुळं मी काही आज तिच्या मेसेज ची वाट नाही बघितली . हो म्हणजे मी गुड मॉर्निंग म्हणून केला होताच . अपने तरफ से गलती मत करों । नाहीतर माझ्या मॅडम मला बोलता बोलता कधी टोला मारतात ना , माझ्या कडे नव्हते network मेजर तर आपल्या कडे नव्हते का ? (( असं काही नाही आहे , माझ बाळ ना खूप मॅचुर आहे . )) ते तर मला तिला मेसेज केल्या वीणा राहवत नाही . मी असच विचार करत होतो आणि अचानक मला हसू आलं . म्हणजे इतके की त्या बाजूच्या बाकावर बसलेलं काका तर अगदी मी वेडा बिडा तर नाही आहे ना , अश्या आंतरर्भावाने माझ्या कडे बघत होते . मी त्यांना मानेने सॉरी म्हणत आपल हसू कंट्रोल केलें .तर त्याचं असे झाला ना , मी काही तरी आणायला बाहेर गेलो होतो आणि आई बरोबर त्यांच्या एक दोन चुगली खोर (( माफ करा पण माझ्या घरा समोर आहेत असे लोकं )) मैत्रिणी आल्या होत्या . मोबाईल घरी चार्जिंग ला लावलेला होता . तेवढ्यात नुसरत मॅडम नि कॉल केला , माझी आई इतकी काही शिकली नाही आहे . मात्र दुसऱ्यांचे फोन त्या न विचारता कधीही घेतं नाही . तर आई ने काही फोन उचला नाही मात्र परत परत बेल वाजत होती तर शेवटी ती फोन घेऊन आली आणि त्यांच्या त्या मैत्रिणी तर होत्याच , तर मी नुसरत चे नाव नुसरत सर म्हणुन सेव केलं आहे . आई ने त्यांना दाखविले असेल की कुणाचं फोन येत आहे ते बघा बरं तर त्या पैकी जास्त शहाण्या असणाऱ्या काकू नी आई ला सांगितलं की कुण्या नुसरत मॅडम चा फोन येत आहे . इतकेच काय तर त्यांनी तिला परत फोन करण्याचं सुद्धा प्रयत्न केला आता मला कसं कळलं तर माझ्या फोन मधे ते अप्स आहे की कुणी तीन वेळा तुमचा पासवर्ड चुकीचा टाकला की त्याचा फोटो काढून घेतला जातो . भले असो त्या पॅटर्न लॉक चे की त्यानं ते काही समजलं नाही . मी घरी आलो तर ही मंडळी गेलेली होती . मी फोन बघितला तर तो चार्जिंग ला नव्हता आणि बाजूला पडून होता . मी फोन बघितला तर पासवर्ड चुकीचा आहे असे स्क्रीन वर दिसले . मी फोन उघडुन आत बघितलं तर तुम्हाला काय सांगू असे असे वाकडे तिकडे फोटो आले होते आणि ते बघून मी जोरात हसायला सुरवात केली . तेव्हड्यात बाबा सुद्धा बाहेरून आले होते मग काय मी त्यांना सुद्धा ते फोटो दाखविले ते सुद्धा हसायला लागले . आई किचन मधून बाहेर येऊन बघते तर काय आम्ही दोघेही खूप हसत होतो . मी ते फोटो आई ल दाखिवले तर थोड का होईना आई सुद्धा हसली . अरे त्याचं काय झालं ना तुझा फोन खूप वाजत होता म्हणून कुणाचं आहे हे बघायला त्यांच्या कडे दिला होता . आई काकुळतीने आपली बाजू मांडत होती . खरं सांगू तर ते खूप कलंतरी फोटो होते , म्हणजे ब्लर झालेले कुणाचं हात कुठं तर कुणाचं चेहरा कसा एकंदरीत काय तर मला इंस्टाग्राम फिल्टर पेक्ष्या जास्त आडवे उभे फोटो मिळाले होते .
मी तो किस्सा आठवत होतो आणि परत एका मेसेज च्या नोटिफिकेशन माझे लक्ष्य विचलित केलं .
Seriously Vikki ....
आणि हो ते सुपर कॉइन म्हणुन आहे काही तर मला सुद्धा मिळतील अशी अपेक्षा आहे .
धन्यवाद....