नुसरत भाग :-०१

4.4K 13 3
                                    

आज दोन महिने झाले , माझी पोस्टिंग श्रीनगर येथे झाली होती . या अगोदर पाच वर्षे मी आसाम मध्ये होतो . त्या नंतर तीन वर्षे दिल्ली येथे होतो . समोर माझ्या बद्दल तुम्हाला आणखी माहीत होणारच आहे तर .

माझे नाव विक्की शिंदे आहे . मी पॅरा कमांडो मध्ये आहे . वयाच्या अवघ्या एकोनविसव्या वर्षी मी आर्मी मध्ये भरती झालो . आता मात्र लग्नाचे वय झाले आहे . आता लग्नाचे वय हे प्रदेशानुसार वेगवेगळे राहते , जसे उत्तर भारतात लवकर मुल लग्न करतात किंवा आसाम मध्ये सुध्दा लवकर लग्न करतात . आपल्या महाराष्ट्रात मात्र तसे नाही आहे . आपल्या येथे मुलाचे वय हे साधारण सत्तावीस ते तीस असते . तर माझे वय आता अठ्ठावीस आहे . आई बाबा तर दररोज फोन करून लग्न कधी करणार आहेस , म्हणून मला विचारतात पण मला मात्र लग्न आता नाही करायचे . कारण मी आज आहे , उद्या नाही . तुम्हाला तर माहीत आहे . एक आर्मी ऑफिसर चे कधी काय होऊ शकते तर नाही का ??? त्यात मी पॅरा कमांडो आहे . मग तर विषय गंभीर आहे ना भाऊ , हे जाऊद्या आता .

मला एक मोठी बहीण आहे , तिचे नाव प्रतीक्षा . ताईचे दोन वर्षे अगोदर लग्न झाले आहे . आई बाबा आहेत आणि माझी आजी .आजोबा मी आठ वर्षाचा होतो तेव्हाच गेले . त्यामुळे त्यांचे प्रेम काही माझ्या नशिबात नव्हते . मात्र माझ्या आजीने मला कधीच काही कमी नाही पडू दिले .

विक्की विक्की विक्की , जी काहा हो . मी माझ्या खोलीतून बाहेर आलो तर मेजर सुधीर काळे होते . ते सुध्दा आपल्याच कडचे आहेत पण येथे दहा वर्षे झाली आहेत त्यामुळे ते हिंदी मध्ये बोलत असतात . क्या हूवा मेजर ??? काहे गला फाड रहे हो . मी हसत त्यांना म्हटले . चल आते हैं मार्केट से , मुझे कुछ लेना हैं . त्यांनी मला म्हटले . त्याना मार्केट मधुन रोज काही ना काही हवे असते . मी तब्बल एका महिन्या पासून त्यांच्या सोबत जात आहे . हे मात्र खूप कमी खरेदी करतात पण ते सुध्दा दररोज नित्य नियमाने . मी मात्र कधीच त्यांना या बद्दल काही नाही म्हटले . कारण माझी दिवटी ही रात्री असते ते सुध्दा आठ ते बारा नंतर मात्र मी आराम करतो . त्यामुळे दिवसा थोडे फिरणे पण होते आणि श्रीनगर बघायला मिळते . ठीक आहे मेजर सिर्फ एक मिनिट , असे म्हणत मी बूट घालू लागलो .

मेजर यांची एक आणखी सवय होती ती म्हणजे रोज ते ऐटियम मधून पैसे काढत असतं . मी हे सुध्दा त्यांना कधी नाही विचारले की असे का ??? चल विक्की होगाया मेरा काम , असे म्हणत आम्ही परत निघालो . मी फक्त त्यांच्या सोबत चालत होतो मनात मात्र खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते . माझ्या डोळ्यात बघून मेजर मला म्हणाले , मुझे पता है विक्की . तू क्या सोच रहा होगा , त्यांनी असे म्हणताच मी थोडा ओशाळलो . नाही सर काही नाही , मी लगेच म्हणालो . विक्की मै रोज बाजार क्यू आता हू , यही तू सोच रहा था ना ??? मेजर हसून मला म्हणाले . मी होकार दिला आणि म्हणालो हो सर अगदी हेच . तो सून , मेरे गाव मे फोन को नेटवर्क नाही रहता है . तो मेरी मां ओर बापूजी से बात नहीं हो पाती हैं . लेकीन मेरे पिताजी दिन में एक बार गावं के बाहर जहा फोन मे रेंज आती है वह जा कर देखते हैं . मेरा कोई मिस कॉल तो नाही लेकीन में जब भी फोन लगाता हु तो फोन बंद रहता है . मेरे पैसे निकलने की वजहासे उनको एक मॅसेज जाता है . तो वो लोग समज जाते हैं की में अभी जिंदा हु . ते असे म्हणाले आणि एकदम शांत झाले . मी पुढे त्यांना काही नाही विचारले . आम्ही आमच्या रूम मध्ये आलो .

आज जेवण करून मी सायंकाळी मेजर सुधीर बद्दल विचार करत बसलो आणि आपोआप माझे हात चालू लागले . आता हात चालू लागले म्हणजे कुणाला मारण्या साठी वैगरे नाही बरं तर लिहण्यासाठी . मी बारावीत होतो आणि तो बॉबी देओल याचा चित्रपट बघितला . टंगो चार्ली , मग काय आर्मी मध्ये जाणे पण नक्की केले आणि सोबत डायरी लीहणे सुध्दा . अगदी तेव्हा पासून मी माझी डायरी लिहायला सुरुवात केली . आता पण थोडे थोडे लिहत असतो . मी आज झालेला प्रसंग पूर्ण पने लिहून काढला . एका आर्मी ऑफिसर चे जीवन असेही असू शकते , या बद्दल एक सामान्य माणूस कधी ही विचार नाही करू शकत .

कोई हमे तो पूछे , हमारे दिल में कितने राज है ...

नुसरत Where stories live. Discover now