कांता 🌺 (भाग - 26)

679 2 0
                                    

ते तीन दिवस जाता जात नव्हते. रात्रंदिवस मला सुरेखाचा ध्यास लागला होता. सुरेखाला मी दोनदाच बघितलं होत. एकदा कांताला सोडायला तिच्या घरी गेलो होतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा रविवारी आक्कासोबत जेवण केल तेव्हा. दोन्ही वेळेस सुरेखा एकदम साध्या अवतारात होती. साधे कपडे, कुठलाही मेकअप नव्हता तरी तिच ते अप्रतिम लावण्य झाकत नव्हत. तिच ते लांब सरळ नाक, काहीस लाजून मंद स्मित करणे. सोळाव्या वर्षी प्रत्येक मुलीत असते ती नजाकत, कोवळेपणा तिच्या सौंदर्यात दसपट भर घालत होता. सुरेखा नुकतीच गावातून शहरात होस्टेलवर रहायला आलेली होती त्यामुळे आधीच काहीशी लाजरी असणारी सुरेखा शहरातील झगमगाट, येथील माणसे पाहून अजूनच बावरलेली होती. पण जेव्हा शाळेचा उंबरठा ओलांडून मुली कॉलेजात दाखल होतात तेव्हाचा काळ हा त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ करणारा असतो. शरीरात बदल होत असतात. नैसर्गिक पणे या वळणावर भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होत असते. ब-याच मुली या वयात पुरुषांकडे आकर्षित होतात. या वेळेला खर तर "हाजीर तो वजीर" हा न्याय लागू होतो म्हणजे मुलींच्या या नाजूक वळणावर जो पुरुष त्यांच्या अधिकाधिक संपर्कात येतो किंवा या अचूक वेळी त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याच हाती या मुली लागतात. म्हणून तर अनेक विजोड असणाऱ्या जोड्या आपल्याला कॉलेज परिसरात बघायला मिळतात. याला ही कशी पटली असेल? हा विचार आपल्या मनात येतो. लेडीज होस्टेलमधे दरवर्षी शंभरेक मुली येतात, त्यात ब-याच सुंदर मुली असतात. पण त्यांच्यात वर्गवारी केली तर टॉप क्लास ब्युटीमधे ज्या दोनतीन मुली येतात त्यात सुरेखा होती हे निश्चित. आणि अश्या टॉप क्लास मुलींची चर्चा कॉलेजच्या मुलांमधे आणि आजूबाजूच्या लोकल मुलांमधे लगेच होते. सगळीकडे त्या आयटम ची चर्चा होते आणि तिच्या भोवती पिंगा घालून तिला पटवण्याचा प्रयत्न सुरू होतो. सुरेखा ची चर्चा परिसरात जोरात असणार आणि तिला पटवण्याचा प्रयत्न अनेक मुले करत असणार यात शंका नव्हती त्यामुळे मला वेळ दवडता "वजीर" व्हायच होत आणि त्यासाठी सुरेखाच्या जास्तीतजास्त संपर्कात येण गरजेच होत कारण गावातून आलेली सुरेखा लगेचच कोणाच्या हाती लागणार नव्हती कारण तिच्या दृष्टीने आता तरी हे सगळ निषिद्ध किंवा चुकीच होत पण जशी ती इथल्या वातावरणात संस्कृतीमधे रुळणार होती तशी तिच्या मानसिकतेत बदल होणार होता. तारुण्यसुलभ नैसर्गिक आकर्षण तर होतच शिवाय येथे मुल मुलींवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मुलींना भारीतले ड्रेस, स्मार्टफोन गीफ्ट करणे, बाईकवर फिरवणे, पिक्चर दाखवणे, हॉटेलमधे डीनर किंवा लंचला नेणे. या गोष्टी सर्रास चालत होत्या. सुरवातीला याकडे तिरस्काराने पाहणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुली नंतर स्वतःच या भुलभुलैयाला बळी पडत होत्या. सुरेखा या सगळ्याला बळी पडून कोणाच्या तरी • हाती लागण्याआधी मी तिला पटवण गरजेच होत नाहीतर चीडीया चुग गई खेत अस झाल असत.

कांताNơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ