कांता 🌺 (भाग - 27)

736 2 0
                                    

गेटच्या समोर झाडाखाली सुरेखा माझी वाट बघत उभी होती. मी जवळ गेलो, गाडी उभी केली तशी ती वेळ न दवडता पटकन मागे बसली. गेटच्या आत थोड्या अंतरावर दोन मुली उभ्या होत्या ज्या सुरेखाकडे बघून हसत होत्या. मी गाडी फिरवली तशी त्यांनी हात हलवून सुरेखाला आधी बाय केल, सुरेखाने त्यांना बाय करताच त्यांनी दोघींनी हाताचा अंगठा वर करुन सुरेखाला बेस्ट लक सारखे विश केले तशी सुरेखा छानपैकी लाजून हसली. हा सर्व प्रकार मी आरशातून पाहत होतो आणि या सगळ्याचा अर्थ मला समजत होता. त्या मुली मला सुरेखाचा बॉयफ्रेंड समजत होत्या किंवा सुरेखा आणि त्यांच्यात तशी चर्चा झाली असणार म्हणूनच त्या सुरेखाला चिडवत तिला प्रोत्साहन देत होत्या. थोड दूर गेल्यावर मी सुरेखाला विचारल की त्या मुली कोण होत्या तर तिने सांगितले की त्या माझ्या रुममेट आहेत. आता सगळे पिक्चर माझ्या समोर क्लीयर झाले होते. सुरेखा आज मागे बसली तेव्हा मागच्या सारख अंतर सोडून बसली नव्हती. ती मला खेटूनही बसली नव्हती आणि अंतर ठेवूनही बसली नव्हती. गाडी खड्ड्यात गेली की तीचा थोडासा स्पर्श मला जाणवायचा. आता दोघांच्याही मनात एक अनामिक हूरहूर होती. तारुण्यसुलभ उत्सुकता थोडीशी भिती हा सगळा अनुभव आम्ही घेत होतो. मी गाडी नगरपालिकेच्या गार्डनकडे आणली. आम्ही बाईक बाहेर लावून एका कडेला झाडाखाली असलेल्या बाकड्यावर बसलो. तिने टु पीसचा लाल पांढऱ्या चेक्सचा मीडी स्कर्ट घातला होता. स्कर्ट तिच्या गुडघ्यांच्या वितभर खाली होता. त्या खाली तिचे नाजूक सुंदर गोरे पाय दिसत होते. त्या मीडीवर ती भलतीच आकर्षक दिसत होती. तिने केसांना दोन्ही बाजूला फुगे काढले होते. कानात खड्याची कर्णफुले होती. चॉकलेटी रंगाची लांबडी टीकली. गळ्यात एक नकली हि-याचा नेकलेस. एका नाजूक मनगटात घड्याळ दुसऱ्या मनगटात डिझाईनच्या बांगड्या. विशेष म्हणजे आज तिने काळ्या रंगाचे आकर्षक सैंडल घातले होते. एकंदरीत आज तिला तिच्या मैत्रीणींनी तयार केले होते आणि त्यांच्या काही वस्तू हिला वापरायला दिलेल्या होत्या. आता ती एवढी तयार होऊन का आली ते न समजण्याएवढा मी दुधखुळा नव्हतो. आम्ही थोड अंतर राखून बसलो आणि गप्पा मारु लागलो. बोलता बोलता मी तिला सांगितलं की तिने आता स्मार्टफोन वापरला पाहिजे तिने सांगितलं तिला कोणी स्मार्टफोन घेऊन देणार नाही. हा साधा फोन मावशीने घेऊन दिला म्हणून नाहीतर हा पण तिला मिळाला नसता. मी तिला सांगितलं की तिची इच्छा असेल तर मी तिला स्मार्टफोन घेऊन देऊ शकतो. पण ती तयार होईना, घरी काय सांगायच? व्हाटसअप चालू केल तर सगळ्यांना समजेल. मी तिला समजावल की स्मार्टफोन फक्त इथंच वापरायचा. सुट्टीला घरी जाताना साधाच फोन न्यायचा. आणि आपण एक वेगळ कार्ड घेऊ, त्या नंबरवर आपण व्हाटसअप सुरू करु. तो नंबर फक्त कॉलेजच्या मैत्रीणींना द्यायचा. हो ना करत खूप चर्चा झाल्यावर ती शेवटी राजी झाली. या चर्चेदरम्यान मी सुरेखाच्या एकदम जवळ जाऊन बसलो. एक दोन वेळा तर मी तिचा हात पण धरला. एकंदर आता कुणीही प्रपोज न करता आमच्यात हळूहळू तसच नात नकळत तयार होत होतं. आम्ही उठलो, मोबाईल शॉपीमधे गेलो, एक चांगला पंधरा हजाराचा मोबाईल घेतला. एक नवीन सीमकार्ड घेतल. आता दुपार होत आली होती, दोघांना भूक लागली होती. मी तिला सांगितलं जेवायला जाऊ तशी ती म्हणाली साध्याच हॉटेलला जेऊ. आम्ही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले. जेवताना दोघे एकदम मनमोकळ्या गप्पा मारत होतो. ती आता खूपच खुलली होती. जेवण करुन आईस्क्रीम खाऊन आम्ही बाहेर आलो. आजचा दिवस खूपच आनंदात चालला होता. सुरेखासारख्या नाजूक, सुंदर लाजाळू मुलीचा सहवास खरच खूप हवाहवासा वाटणारा होता.

कांताHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin