ता ना पि हि नि पा जा : भाग १

10.8K 20 3
                                    

ता वरून तांबडा
ता वरून तारुल मॅडम


ग्रामपंचायतीच्या कौलारू शाळेत ग म भ न शिकून आपल्या शिक्षणाची सुरुवात करणारी माझी मागची पिढी असो, किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ आ इ ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणाऱ्या कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये ए बी सी डी शिकणारी पुढची जनरेशन असो. जसे जनरेशन वाईज आपण पुढे सरकत आहोत तसेच आपल्या भाषेत, पोशाखात, राहणीमानात बदल घडत आहेत. याला सेक्स हा विभाग सुद्धा अपवाद नाही. मागची पिढी जशी प्रेम, शृंगार, काम वासना, संभोग असे वजनदार शब्द मांडत होती तेच नवीन जनरेशन या सगळ्या वजनदार शब्दांना सोपा पर्याय म्हणून फक असा शब्द वापरते. जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे यात पण काही अर्थ नसतो. पण दिवसामागून दिवस जातील, जुन्या पिढ्या जाऊन नवीन जनरेशन येतील पण दोन जीव जेव्हा उत्साहाने प्रेम शृंगाराचा अवलंब करतील, संभोगाचा आनंद एकमेकांना देण्यासाठी झटतील तेव्हाच त्याच्या काम जीवनाचा परमोच्च आनंद त्या दोन जीवाची तगमग समजून त्यांना आपल्या मिठीत घेतो. हा काम सूत्राचा प्राथमिक नियम पृथ्वीवर शेवटचे स्त्री आणि पुरुष शिल्लक राहिले तरी कणभर बदलणार नाही.


सन १९९२, राम मंदिर की बाबरी मशिद हा वाद जास्तच फोफावला आणि मुंबईचे वातावरण जास्तच तंग झाले. ऑस्ट्रेलिया मध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी गेलेला भारतीय क्रिकेट संघ जेमतेम दोन मॅच जिंकून आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाल्यामुळे एकूण फक्त पाच गुण घेऊन पहिल्याच फेरीत गारद झाला आणि उपांत्य फेरी गाठूही शकला नाही. यातच जिभेवर ठेवलेली बर्फी पण कडू लागेल अशी बातमी म्हणजे पुढे हाच विश्वचषक पाकिस्तानने जिंकला. अशा सर्व नकारार्थी वातावरणात इंद्रधनुष्य जन्मला. इंद्रधनुष्य असे अजब नाव आयुष्यभर कॅरी करायचे म्हणजे आजूबाजूच्या लोकांना आपल्या वर गमती जमती करण्याचे उघड उघड आमत्रंण देणे होय. पण काय करणार या जगात आपले नाव आपणच निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला या निसर्गाने दिले नाही म्हणून मग आपल्या कुटुंबीयांनी आपल्यावर थोपवलेल्या नावासकट आयुष्य जगावे लागते. नेमके इंद्रधनुष्यचे तसेच झाले.

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now