ता ना पि हि नि पा जा : भाग १९

2.2K 9 5
                                    

पा वरून पारवा
पा वरून पायल मॅडम

पा वरून पारवापा वरून पायल मॅडम

Oups ! Cette image n'est pas conforme à nos directives de contenu. Afin de continuer la publication, veuillez la retirer ou mettre en ligne une autre image.


इंद्र्धनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खूश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला हव्या असलेल्या सेक्स कामात पण महानिपुण होता. तिच्या जीवनात किती वर्षाने आनंद डोकावत होता. ती आयुष्यातील सर्वात आनंदी स्लॉट अनुभवत होती.

 

त्याच्या कंपनीला एक गोव्याचे मोठे प्रोजेक्ट ऑफर झाले होते. पण त्याच्या कंपनीला यासाठी एक टेंडर भरावे लागणार होते. जर त्याचे प्रेझेन्टेशन उत्तम झाले आणि त्यांची  प्रोजेक्टसाठी लागणारी प्रोडक्शन कॉस्ट इतर कंपनी पेक्षा कमी असेल तर त्यांना हे प्रोजेक्ट नक्की भेटले असते. पण हे वाटते तितके सोपे नव्हते. हे प्रोजेक्ट जितके अवघड होते तितकेच या प्रोजेक्ट मधून प्रॉफिट आणि मार्केट मध्ये नाव कमवण्याची त्याच्या कंपनीला मोठी संधी होती. पण या संधीसाठी भारतातील अनेक कंपन्या आपले नशीब आजमावणार होते याबाबत शंकाच नाही.

 

या प्रोजेक्टचा आवाका लक्षात घेता कंपनीने सर्वात महत्वाच्या एम्प्लॉयीला हि जवाबदारी सोपवली. ती व्यक्ती म्हणजे निशा होय. निशाला सांगितले काहीही कर पण हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीला भेटले पाहिजे. निशा सुद्धा हे शिवधनुष्य उचलण्यासाठी कंबर कसू लागली. निशाची पूर्ण टीम या प्रोजेक्ट साठी प्रयत्न करू लागली. अर्थातच त्याचे लीड निशा करत होती. इंद्रधनुष्यला इतका अनुभव नक्की आला होता कि तो या प्रोजेक्ट मध्ये महत्वाचा रोल प्ले करत होता. अप्रत्यक्षरीत्या तो या टीमचा उपकर्णधार झाला होता. हे निशाच्या वशिल्याने झाले नव्हते तर त्याने केलेल्या २ ते ३ वर्षाच्या मेहनतीमुळे शक्य झाले होते. यात ऑफिसची महत्वाची प्रोजेक्ट होती ज्यात इंद्रधनुष्यचे योगदान खूप मोठे होते. या सर्व मेहनतीनंतर त्याने निशा बरोबर श्रुंगारलेलेया रात्री होत्या. त्या रात्रीचे मोल नक्कीच होते पण ते निशा आणि इंद्रधनुष्यचे नाते घट्ट करण्यासाठी होय. दोघेही प्रॅक्टिकल होते म्हणून ते भावना प्रधान होणे वगैरे त्यांना माहित नव्हते आणि हेच त्याच्या नात्याचे गमक होते ज्यामुळे हे नाते जरी अनैतिक असले तरी ताठ कण्यासारखे टिकून होते.

ता ना पि हि नि पा जाOù les histoires vivent. Découvrez maintenant