ता ना पि हि नि पा जा : भाग १६

2.3K 2 1
                                    

नि वरून निळा
नि वरून निशा

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमी प्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वतःच्या चेहऱ्यावर इतका आनंद पहिला नव्हता. संध्याकाळी सहा वाजता तिचे ऑफिस सुटणार होते. सहा वाजता जरी ऑफिस सुटणार असले तरी ती आज पावणेसहा वाजता ऑफिस मधून निघायचा तिचा प्लॅन होता. साडे सहा वाजता ती दोघे मरीन ड्राइव्हला भेटणार होते. जरी डेट त्याची साडे सहाला असली तरी ती आताच मनाने त्या डेट पर्यंत पोहोचली होती. आज तिचे ऑफिसच्या कामात मुळीच लक्ष नव्हते. ती उघड्या डोळ्याने स्वप्न पाहत होती कि आजच्या स्वप्नवत डेट मध्ये काय होईल. कधी एकदा मी इंद्रधनुष्यच्या मिठीत स्वतःला सामावून घेईल. संध्याकाळी घडू शकणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या डोळ्यासमोर झर्रकन उभा राहत होता.

 

सर्व काही साखरेच्या पाकाप्रमाणे गोड वाटत होते इतक्यातच त्या गोडव्यात मिठाचा खडा पडावा तसे काही खारट घडले. इकडे इंद्रधनुष्य आपल्या रात्रीच्या डेट साठी खूप एक्साइट होता. त्याच्या मुलाखतीला अजून चार दिवस अवधी होता म्हणून निदान आज तरी त्याने मुलाखतीच्या राऊंडचा विचार बाजूला ठेवला होता. इतक्यात ते घडले ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. त्याला त्याच नामाकिंत कंपनी मधून कॉल आला जिथे तो फायनल राऊंड साठी वीस तारखेला जाणार होता. हा कॉल त्या कंपनीच्या एच आर चा होता. त्या फोन वरून समोरून येणारा आवाज इंद्रधनुष्य बारकाईने ऐकू लागला. त्या कॉल वरील सगळे बोलणे ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याने पुन्हा त्या एच आर ला समजावण्याचे प्रयत्न केले. पण एच आर आपल्या बोलण्यावर ठाम होते. शेवटी तो ओके बोलून त्याने फोन कट केला. जसा फोन कट केला तसा त्याचा चेहरा अजून पडला. सकाळ पासून त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अचानक नाहीसा झाला. तो फोन यासाठी होता कि तो ज्या प्रोजेक्ट साठी त्या नामांकित कंपनी मध्ये इंटरव्यू देत होता. ते प्रोजेक्ट त्या क्लायंट गरजेनुसार लवकर इम्पलिमेन्ट करण्याचे ऑर्डर्स आले होते. त्यामुळे लवकरात लवकर इंटरव्यू घेऊन नवीन एम्प्लॉयी लवकरात लवकर जॉईन करून घेण्यासाठी कंपनी आग्रही होती. त्यामुळे त्या कंपनीने डिसाईड केले होते कि जी इंटरव्यू वीस तारखेला होती ती आज म्हणजे सोळा तारखेला प्रेपॉन केली होती. त्याने एच आर ला खूप समजावले पण एच आर ने स्पष्ट सांगितले कि जर तो या इंटरव्यूसाठी आज आला नाही तर त्याला या पदासाठी कन्सिडर केले जाणार नाही अर्थात त्याला या जॉबसाठी फायनल इंटरव्यू अगोदरच मुकावे लागेल.

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now