ता ना पि हि नि पा जा : भाग १७

2.5K 4 1
                                    

नि वरून निळा
नि वरून निशा

नि वरून निळानि वरून निशा

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.


इंटरव्ह्यू सुरू झाली. एका मागोमाग एक कँडीडेट आत केबिन मध्ये जात होता. इंटरव्ह्यू खूप वेळ घेत होते. प्रत्येकाला २० ते ३० मिनिटे लागत होते. असे करून एका मागोमाग एक जण इंटरव्ह्यू देऊन बाहेर येत होता. असे करून चार जण इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडले. घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीस मधला सगळा स्टाफ ऑफीस मधून निघून गेला. पुर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिन मधील एकच व्यक्ती इंटरव्ह्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वतःची बिल्डिंग होती. पुर्ण बिल्डिंग मध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजुन काम करत होते. पण बाराव्या मजल्यावर तर सगळे सामसूम होते. इतक्यात पाचवा कँडीडेट केबिन मधून बाहेर आला आणि त्याने इंद्रधनुष्यला आत जाण्यास खुणाविले. असे बोलून तो पाचवा कँडीडेट निघून गेला. आता पूर्ण फ्लोअरवर फक्त इंद्रधनुष्य आणि केबिन मधील व्यक्ती अशा दोनच व्यक्ती होत्या. बाकी सर्व ऑफीस सामसूम होते. इंद्रधनुष्यने उभे राहून आपली कॉलर आणि आपली इन सरळ केली. घड्याळात आता रात्रीचे ८.१५ झाले होते. पुढे जाऊन त्याने दरवाजा नॉक केला. आतून कम इन आवाज आला. आवाज अगदी छानच म्हणजे मधुर होता. इंद्रधनुष्य केबिन मध्ये जाताच तो आवाज कुठून आला हे शोधू लागला. समोर एक मोठे डेस्क होते आणि मागे एक ऑफीस चेअर होती. या चेअर वर एक व्यक्ती बसली होती त्या व्यक्तीचाच हा आवाज होता. पण ती व्यक्ती उलटी होऊन तिच्या मागे असलेल्या कपाटातील एक फाईल शोधत होती म्हणून ती व्यक्तीचा फेस समोर उभ्या असलेल्या इंद्रधनुष्यला दिसत नव्हता. पण काम करतच त्या व्यक्तीने आपल्या मधुर आवाजात त्यास बसण्यास सांगितले. तोही आभार मानून निमूटपणाने बसला. अजुन त्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसला नव्हता. पण ती व्यक्ती पुरुष नव्हता तर स्त्री होती हे मात्र कळले होते. त्या मॅडमने एक लाईट ब्ल्यू कलरचा टॉप घातला होता. खाली तिने डार्क ब्ल्यू कलरचा स्कर्ट घातला होता. समोर डेस्क होता म्हणून नीट कळत नव्हते की तो स्कर्ट किती लाँग आहे की किती शॉर्ट आहे. पण तो टॉप आणि स्कर्ट तिच्या शरीराला घट्ट पकडून होता. त्यामुळे त्या मॅडमच्या शरीराचा फिगर मागून स्पष्ट दिसत होता. तिने घातलेल्या निळ्या टॉप मधून तिच्या पाठीवर असलेल्या ब्राच्या स्ट्रीपस् कुठे असतील याची जाणीव मागे बसलेल्या इंद्रधनुष्यला नीट येत होती. तिचे केस काळे भोर असतील त्यावर काही ठिकाणी सोनेरी केले होते. फाईल शोधता शोधता ती मॅडम मध्येच आपले केस मागे घेत होती. ह्या सगळ्या कामुक विचारांना इंद्रधनुष्यने आळा दिला आणि आपल्या आयुष्यातील आजच्या पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या इंटरव्ह्यूकडे लक्ष दिले.

ता ना पि हि नि पा जाDonde viven las historias. Descúbrelo ahora