ता ना पि हि नि पा जा : भाग २२

2.1K 1 0
                                    

पा वरून पारवा
पा वरून पायल मॅडम

निशाचे प्रेझेंटेशन झाल्यावर एक मुद्दा इंद्रधनुष्य समजावू लागला

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

निशाचे प्रेझेंटेशन झाल्यावर एक मुद्दा इंद्रधनुष्य समजावू लागला. इंद्रधनुष्य आधी घाबरला होता पण जशी वेळ पुढे सरकत होती तसा त्याचा कॉन्फिडन्स वाढू लागला. तो पायल आणि स्टिफनकडे बघून प्रेझेंटेशन देऊ लागला. निशाच्या सौन्दर्यापुढे इतका वेळ गप्प बसून असणारा स्टिफन आता मात्र इंद्रधनुष्यला निरनिराळे प्रश्न विचारत होता. पण इंद्रधनुष्यचा अभ्यास पक्का होता तो निडरपणे उत्तर देत होता. यावेळी एक फरक जाणवत होता. निशा जेव्हा प्रेझेन्टेशन देत होती तेव्हा स्टिफन घायाळ होऊन तिला एकही प्रश्न विचारत नव्हता. प्रश्न विचारत होती ती फक्त पायल. आता जेव्हा इंद्रधनुष्य प्रेझेन्टेशन देत होता तेव्हा मात्र स्टिफन प्रश्न विचारत होता आणि पायल एकदम शांत होऊन इंद्रधनुष्यकडे एकटक बघत होती. त्यात इंद्रधनुष्य सुद्धा प्रेझेंटेशन मध्ये एका मागोमाग एक चौकार मारत होता. त्यामुळे पायल मॅडम त्याच्यावर इम्प्रेस झाली हे निदान तिथल्या परिस्थितीवरून तरी वाटत होते. या सर्वाचा त्या प्रोजेक्ट मिळवण्यासाठी कितपत फायदा होईल माहिती नाही पण तूर्तास सर्व काही निशा आणि इंद्रधनुष्यच्याच बाजूने होत होते. सर्वात शेवटी काही महत्वाचे प्रश्न विचारले तेही या दोघांनी अचूक उत्तरे देऊन पायल आणि स्टिफनची मने जिंकली.

 

अशा प्रकारे हे प्रेझेन्टेशन पार पडले. याचा निकाल आता उद्या सकाळी कळणार होता. तो पर्यंत कुतुहुलाची दोघांना धाकधूक होतीच. पण निशा किंवा इंद्रधनुष्य किंवा त्याची पूर्ण टीम म्हणा यांनी या प्रोजेक्ट प्राप्तीसाठी दिवस रात्र मेहनत केली होती.


निकाल जरी उद्या लागणार होता तरी आज संध्याकाळी त्या हॉटेल मध्ये पायल मॅडम यांनी एक पार्टी ठेवली होती. त्यात तिथे टेंडर साठी आलेल्या सर्व कंपनी साठी निमंत्रण होते. अर्थातच निशा आणि इंद्रधनुष्य साठी सुद्धा हे निमंत्रण होते. गोव्याला आल्या पासून निशा आणि इंद्रधनुष्य फक्त काम आणि काम करत होते त्यामुळे थोडे चिल होण्यासाठी हि पार्टी म्हणजे चांगली संधी होती.

संध्याकाळी हि पार्टी सुरु झाली. निशा आणि इंद्रधनुष्य या पार्टी साठी हजर झाले. निशाने परिधान केलेल्या सिल्व्हर कलरच्या वन पीसमुळे तिथे जमलेल्या सर्व पुरुषांच्या नजर तिच्यावर स्थिरावल्या. सगळ्या पुरुषांच्या गळ्यात आवंढे फक्त निशाच्या रुपामुळे गळ्यातच गिळले गेले. स्टिफन हा सकाळी निशासाठी आतुर होता, पण आता निशाला पाहून तो घायाळ झाला होता. इकडे कपल डान्सला सुरुवात झाली. इंद्रधनुष्य आणि निशा एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून नाचू लागले. दोंघाच्या नजरा एकमेकांच्या डोळ्यात भिडल्या.  निशा आणि इंद्रधनुष्य एकत्र नाचतच होते कि इतक्यात स्टिफन तिथे आला आणि त्याने निशाला आपल्या बरोबर डान्स करण्यासाठी निमंत्रण केले. आपला उजवा हात तिच्या समोर केला. निशा अचानक केलेल्या या प्रश्नाने भांबावून गेली. तिने इंद्रधनुष्यकडे पाहिले. इंद्रधनुष्यने डोळ्याने तिला जाण्यासाठी समर्थन केले. तसे पण इथे नकार द्यायला कोणतीच संधी नव्हती कारण उद्या त्याच्या टेंडरचा निकाल होता आणि जर स्टिफन नाराज झाला तर हे टेंडर गमावलेच समजा. निशाने एक गोल्डन स्माईल देऊन आपला उजवा हात स्टिफनच्या हातात दिला.  

भाग २३ लवकरच
क्रमशः

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now