ता ना पि हि नि पा जा : भाग ४

4.2K 9 0
                                    

ना वरून नारंगी
ना वरून नाजुका मावशी

ना वरून नारंगीना वरून नाजुका मावशी

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या सारख्या उपनगरी निम शहरी भागात अ‍ॅडमिशन भेटेल. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके कमीही नव्हते की त्याला अभियांत्रिकी शाखेत अ‍ॅडमिशन सुध्दा भेटणार नाही.

 

अपेक्षेप्रमाणे चांगले टक्के भेटल्यावर इंद्रधनुष्य हा इंजिनीयरींगला अ‍ॅडमिशनसाठी प्रयत्न करू लागला. पण मुंबईमध्ये काही अ‍ॅडमिशन झाले नाही. कोकणाच्या एका अभियांत्रिकी कॉलेज मध्ये त्याचे अ‍ॅडमिशन झाले. कॉलेजचे ऑप्शन्स भेटले होते त्यात कोकणाचे कॉलेज निवडण्यामागे हेतू हाच होता की त्या कॉलेजपासून जवळच त्याच्या आईची दूरची बहीण राहत होती म्हणजे ती इंद्रधनुष्यची दूरची मावशी म्हणता येईल. पण खरच गरज असेल त्यावेळी मदत करणे म्हणजे त्या नात्याला दूरच्या नात्यापासून जवळच्या नात्यात स्थलांतर करण्यासारखे होय. तसेच नेमके त्या दूरच्या मावशीने केले. मावशी कॉलेज पासून फक्त तीन किमी अंतरावर राहत होती. मावशीच्या घरी फक्त मावशी आणि तिचे यजमान राहत होते. कोकणात बहुधा सगळ्याची घरे विस्तीर्ण असतात. मावशीचे घर पण त्याला अपवाद नव्हते. या मोठ्या घरात मावशी आणि तिचा नवरा दोघेच राहत होते. मावशीच्या नव-याची खूप मोठी शेती आणि बागायती शेती होती. या बागायती शेतीत आंबा, फ़णस, काजू इत्यादी फ़ळांची खूप फळझाडे होती. ह्या सर्वांची निगा राखण्यासाठी शेतात काही मेहनती मंडळी त्या दांपत्याकडे होती त्यामुळे  मावशी आणि तिचा नवरा निर्धास्त होते. त्याचे घर आकारमानाने मोठे असून कोकणातल्या इतर घरासारखे कौलारु आणि टुमदार होते. घराच्या शेजारी गोलाकार झाडे लावल्यामुळे तो परीसर छान हिरवागार आणि रमणीय झाला होता. त्या हिरव्यागार निसर्गात मावशीचे घर ऐटीत उभे होते. त्याच मावशीच्या घराशेजारी एक छोटीशी वेगळी रुम काढली होती. त्याचा दरवाजा तसा मुख्य घरापासून स्वतंत्र्य होता. त्या वेगळ्या रुमला तुम्ही शहरी भाषेत आऊट हाऊस बोलू शकता. या आऊट हाऊसला मावशीने छान साफ करून घेतले. याच आऊट हाऊस मध्ये इंद्रधनुष्यची राहण्याची सोय केली होती. फक्त जेवणासाठी तो मावशीच्या मुख्य घरात जात असे. मावशी तशी जेवणात सुगरण होती म्हणून तिच्या हातच्या पक्वानाचा आस्वाद घेणे म्हणजे जेवणाची लज्जत वाढत असे.

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now