ता ना पि हि नि पा जा : भाग १०

3.2K 9 0
                                    

हि वरून हिरवा
हि वरून हिना

हि वरून हिरवाहि वरून हिना

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळया विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरु झाले. दुसऱ्या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसऱ्या वर्षीचा अभ्यास जास्त कठीण होता त्यामुळे जास्त लक्ष देणे अधिक आवश्यक होते. जर अभ्यासात लक्ष द्यावे गरजेचे असेल तर त्या आधी इतर अवांतर गोष्टीतील लक्ष काढून घेणे अतिगरजेचे होते. त्याने आपले ता वरून तारूल, ना वरून नाजुका आणि पि वरून पियुषा हे सगळे भूतकाळातील चॅप्टर क्लोज केले आणि वर्तमानातील अभ्यासावर लक्ष देण्याचे योजिले कारण यावरच त्याचा भविष्य काळ अवलंबून होता.

 

इकडे नाजूका मावशी गरोदर होती. तिच्या घरात आनंदीआनंद पसरला होता. गेली अनेक वर्ष ज्या सुखासाठी ते कुटुंब तडफडत होते तो आनंद त्या कुटुंबापासून फक्त उणेपुरे महिने दूर होते. अर्थातच यात इंद्रधनुष्यचे श्रेय किती होते हे फक्त नाजुका मावशीलाच माहिती होते. हा हा म्हणता नाजूकाचे सहा महिने पूर्ण झाले. तिची काळजी घ्यायला इथे स्त्री व्यक्ती कोणी नव्हते म्हणून ती माहेरी जाण्यासाठी तयार झाली. पण ती माहेरी गेली तर इथे तिच्या नवऱ्याचे आणि इंद्रधनूष्यचे जेवणखाण तसेच घराची इतर कामे कोण करणार म्हणून त्यासाठी हिनाला ठरवण्यात आले. हिना हि त्याच गावात राहत होती. तिच्या नवऱ्याचे एक दुकान होते जेथे अनेक वस्तू भेटत असत. पण छोट्या खेड्यात असलेले ते छोटे दुकान काही विशेष चालत नसे पण पोट भरण्याइतके नक्कीच पैसे भेटत असे. पण आपल्या नवऱ्याला मदत म्हणून हिना गावातील घरगुती कामे करत असे. कधी कोणाच्या घरी जेवण बनवायला जा. तर कधी कोणाच्या घरी भांडी घासायला जा. कधी कोणाचे धान्य जात्यावर दळून द्या. तर कधी कोणाच्या शेतावर शेतीच्या कामासाठी जा. गावाच्या ठिकाणी विशेषतः कोकणात प्रॉपर नोकर हा प्रकार कमी असतो पण ती भेटेल ते काम करून आपल्या धन्याला मदत करत होती. इतकी अनेक कामे करता करता ती मल्टीटास्किंग झाली होती. शिवाय तिच्या कामाने सर्व गाव खुश होता म्हणून तिला कामे पण भेटत असत. नाजुका माहेरी जाण्यापूर्वी तिने सर्व काम हिनाला समजावून सांगितले. तसा हिनावर नाजुकाचा विश्वास होता कि तिच्या गैर हजेरीत ती उत्तम काम करेल. हिनाने पण नाजुकाला ग्वाही दिली कि तिच्या अनुपस्थित तिच्या घराला तिची कमी भासू देणार नाही. तिची सर्व कामे ती जीव लावून करेल.

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now