ता ना पि हि नि पा जा : भाग २१

2K 3 1
                                    

पा वरून पारवा
पा वरून पायल मॅडम

पा वरून पारवापा वरून पायल मॅडम

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.


पायल मॅडम ह्या प्रसिद्ध मल्होत्रा इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा राहुल मल्होत्राची पत्नी होती. त्याच्या अनेक कंपनी मधील काही कंपनी पायल मॅडम बघत असे. अर्थातच ही कंपनी पण पायल बघत होत्या. पायल मॅडमचे वय जरी पंचेचाळीस असले तरी त्याच्या रूपक आणि कमनीय बांधावरून त्या अवघ्या पस्तीस वर्षांच्या वाटत होत्या. एखाद्या तिशीतील स्त्रीला पण त्यांचा फिगर बघून हेवा वाटेल इतके सर्व मेन्टेन आणि टापटीप होते. एक गडद निळ्या म्हणजे पारव्या रंगाचा बिझिनेस सुट त्यांनी घातला होता. रंगांनी गोऱ्या, डोळ्यात ओजस्वी तेज,ओठात गुलाबी रंग ठासून भरलेला असे एखादी खानदानी स्त्री सारखे पायलचे रुपडे होते. छातीवर असलेल्या श्रीमंतीमुळे तिचा सूट समोरच्या बाजूला फुगीर आणि झुकला होता. चरबी मुक्त कंबर बरोबर योग्य ठिकाणी आकुंचन पावली होती. खाली नितंबांत पुन्हा एक प्रकारचा मादक फुगीरपणा आल्याने सर्व काही परफेक्ट होते. पायल मॅडमला पाहून धनाच्या श्रीमंतीचा सौंदर्याची श्रीमंतीशी मेळ झाला असे वाटत होते.

दुसऱ्या बाजूला स्टिफन सर होते ते मूळात न्युझीलंडचे होते. एखादा गोरा फोरेनर जसा असतो नेमके तसेच गोरा, उंच, पिळदार शरीरयष्टी असलेले स्टिफन सर होते.


अखेर प्रेझेन्टशन सुरू झाले. एक एक कंपनी हॉल मध्ये जाऊन प्रोजेक्टरवर आपले प्रेझेंटेशन देऊ लागले. पायल आणि स्टिफन हे दोघे बिझिनेस क्षेत्रात मुरलेले होते त्यामुळे ते प्रेझेंटेशन मधले दिखाऊपण लगेच पकडत असतं आणि मग तऱ्हेवाईक प्रश्न विचारत असत. अशा प्रकारे बरेच जण या प्रेझेंटेशन मध्ये बाद होताना दिसले. काहींना प्रेझेंटेशन देता देता मध्येच थांबवून परत माघारी परतायला सांगितले. अशा प्रकारे सर्व काही आलबेल परिस्थितीत प्रेझेंटेशन सुरू होते. 

 

आता बारी होती निशा आणि इंद्रधनुष्यची. दोघेही आत्मविश्वासाने हॉल मध्ये गेले. पायल आणि स्टिफन यांना गुड मॉर्निंग करून आपले प्रेझेंटेशन सुरू केले. निशाने आपला झंझावात सुरू केला. तिचे फ्लुयंट इंग्लिश आणि कम्युनिकेशनवर असलेला ताबा तिच्या प्रेझेंटेशन मध्ये साफ झळकत होते. काही मिनिटातच तिने प्रेझेन्टशनची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले. पायल आणि स्टिफन दोघेही तिचा आत्मविश्वास बघून तिच्यावर खुश होते. शिवाय तिचे प्रत्येक मुद्दे ती उदाहरणासह समजावून सांगत होती. मध्ये मध्ये पायल तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होती पण ती त्याचे अचूक आणि पटेल असे उत्तर देत होती. तिच्या या पावित्राचा फायदा या प्रोजेक्टला होणारच होता पण तूर्तास स्टिफन तिच्याकडे पापण्या न बंद करता एकटक बघत होता. तशी निशाची पर्सनालीटी खूपच मोहक होती आणि आज त्या बिझिनेस सूट मधील टॉप आणि त्या वरील जॅकेट तर खाली किंचित गुडघ्या खाली असलेला स्कर्टमध्ये ती रूपमती अजूनच खुलून दिसत होती. स्कर्टला मागून एक फुटाची कट होती. जेव्हा ती पाठमोरी होऊन प्रोजेक्टरकडे बघून चालत असे तेव्हा स्टीफनची नजर त्या कट वरच जात होती. तिला पाहून तो इतका भांबावून गेला की प्रश्न विचारायचे त्याने सोडूनच दिले. 


भाग २२ लवकरच

क्रमशः

ता ना पि हि नि पा जाWhere stories live. Discover now