ता ना पि हि नि पा जा : भाग २५

2.7K 17 9
                                    

जा वरून जांभळा
जा वरून जाई ?

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर  इंद्रधनुष्यास आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यास आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव इंद्रधनुष्य का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता. त्याच्या जीवनात आलेल्या सहा स्त्रिया या साधारण नव्हत्या. प्रत्येक स्त्री ही आपल्यातच नाविन्यपूर्ण होती. अनेक वैविध्यपूर्ण वैशिष्टे घेऊन पृथ्वीतलावर आपला सुगंध दरवळत होती. या सहा स्त्रिया इंद्रधनुष्यच्या जीवनात आल्या हा दैवी चमत्कार म्हणावा. ता वरून तारुल, ना वरून नाजुका, पि वरून पियूषा, हि वरून हिना, नि वरून निशा, पा वरून पायल म्हणजे त्याच्या जीवनात आलेले इंद्रधनुषी सहा रंग होय. ता ना पि हि नि पा होय. पण इंद्रधनुष्यातील सात रंगातील एक रंग अजुन शिल्लक होता तो म्हणजे जा वरून जांभळा. आता ही जा वरून स्त्री कुठे शोधायची की ती पण इतर स्त्री सारखे स्वतःहून समोर येईल आणि तिचा प्रेमरस इंद्रधनुष्यला चाखायला देईल असे अनेक प्रश्न त्याला पडत असे. पण हेच जीवन होते म्हणून सध्या तरी वेट आणि वॉच हेच इष्ट होते.

आता इंद्रधनुष्य अठ्ठावीस वर्षांचा झाला होता. आपल्या जॉबमध्ये तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अविवाहित तरुण मुलगा स्थिरावला की त्या मुलांपेक्षा त्याच्या पालकांची चुळबुळ सुरु होते ते त्याच्या लग्नासाठी. इंद्रधनुष्यची आई सुद्धा त्याच्यासाठी मुलगी शोधू लागली. इंद्रधनुष्य नेहमी म्हणत असे की मला अद्याप लग्न नाही करावयाचे आहे. पण त्याची आई काही त्याच्या या बोलण्याला जुमानत नसे. आईनेच पुढाकार घेऊन त्याचे नाव विविध वधू वर सूचक मंडळात नोंदवले. जशी अपेक्षा होती तसाच प्रतिसाद इंद्रधनुष्यच्या स्थळाला भेटू लागला. असे अनेक मुलींचे फोटो आई ही इंद्रधनुष्यला व्हॉट्सॲप करत असे पण इंद्रधनुष्य मात्र काहींना काही कारण काढून त्यातले एकही स्थळ पसंद करत नसे.

Has llegado al final de las partes publicadas.

⏰ Última actualización: Sep 04, 2022 ⏰

¡Añade esta historia a tu biblioteca para recibir notificaciones sobre nuevas partes!

ता ना पि हि नि पा जाDonde viven las historias. Descúbrelo ahora