5 भुताचा पोस्टमन

4 0 0
                                    

पाच

"इटस् इंपॉसिबल. पोस्टातच आहेस ना तू? का लेखकबिखक झालास तिकडे जाऊन? काय पण नव्या गोष्टी रचतो. ह्या.. ह्या.. ह्या.. म्हणे एक गाव तीस वर्षांपूर्वी भुकंपात पुर्ण गाडलं गेलं आणि आजघडीला तिथे काहीही अस्तित्वात नाहीये, अशा गावात हा जाऊन आला आणि तिथे त्याला त्या गावचे लोकसुद्धा भेटले म्हणे. काय पण भंकस आहे. ह्या.. ह्या.. ह्या.." संतोषने टर उडविली तेव्हा विकास व मित्रांचा पुन्हा कॉन्फरन्स कॉल चालला होता.

"रांडीच्या विक्या... इतक्या रातचं अशा गोष्टी कशाला सांगतो रांडीच्या. पोरीबाळी हायेत फोनवर. एखादी घाबरली म्हण्जे?" संदीप म्हणाला.

"ए विकास. नको ना रे अशा गोष्टी करू. माझं गरीब गावरान मेंढरू घाबरलं बघ. घाबरू नको हां सोन्या. आत्ताशी रात्रीचे अकरा वाजले बघ. मी आहे ना जागी. आय लव यू माझ्या कोकरा.." सोनाली पुन्हा नाटकी स्वरात म्हणाली.

"ए मैना... जरा गप की. च्यायला ह्या संदीपच्या. नको नको म्हणत असताना देखील फ्लॅट भाड्याने घेतला तर कुठं? कब्रस्तानाजवळ. आख्ख्या पुण्यात हीच जागा सापडली ह्याला. रात्र पडल्यावर घाबरायला होईल नाहीतर काय होईल? साला अभ्यास कमी करतो आणि रात्री उठून गॅलरीतनं एकेका कबरीचं निरिक्षण करत सिगरेट फुंकत बसतो. आणि ह्याला म्हणे कलेक्टर व्हायचंय." निलेश खरंतर सोनालीच्या नेहमीच्या लांबलचक हेलवर चिडला होता आणि त्याचा राग निघाला संदीप वर.

"ए संदया. आसं करत जाऊ नये बाळा. एखादा मुडदा उठून सिगरेट प्यायला गॅलरीत आला म्हण्जे?" इति संतोष.

"आलं तर येऊ दे. तेला रांडीच्यालाबी सकाळलोक पुरतील एवढा स्टॉक आसतो आपल्याकडे. काकडआरतीची येळ झाली की जाईल गुमान निघून. पण तुम्ही रांडीच्यांनो.. त्या इकासचा प्रॉब्लेम दिला सोडून आन माज्या कावून मागं लागले? आं... ते काय म्हणतंय ऐका की." संदीपने सगळ्यांना तंबी दिली.

"अरे खरंच की. पण डॉक्टरांनी सल्ला दिला तसा फोन लावलास का तू आधीच्या पोस्टमन काकांना?" विशाखाने मूळ मुद्द्यावर येत विचारलं.

भुताचा पोस्टमन Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ