10 & 11 भुताचा पोस्टमन

3 0 0
                                    

दहा

“आता काय करायचं? पुढे गाडी जाणं शक्य नाही.” ओढा पार करण्यासाठी इंग्रजांच्या काळात बांधलेला दगडी पूल आता पार कोसळलेल्या अवस्थेत पाहून संतोषने विचारलं. त्याने इथपर्यंतच गाडी कशीबशी आणली होती. ओढा फारसा खोल नसला तरी वाळू आणि मातीतून गाडी पुढे काढणे इतके काही सहज नव्हते आणि पलीकडच्या बाजूला दाट झुडुपं असल्याने त्यातून गाडी घेऊन जाणेही शक्य नव्हते.

“अर्ध्यापेक्षा जास्त आलो आपण. काही वाईट नाही. गाडी इथेच पार्क करून चालत जाऊया.” मोबाइलमधून डोके वर करत नीलेश म्हणाला. मोबाइलला अजूनही रेंज असल्याने तो खुशीत होता.

“पीयूष तू कुणाला तरी सोबत घेऊन बाजूच्या झुडपात पोस्टमनची गाडी शोध.” खाली उतरलेल्या काकडे साहेबांचा जरा जरबीचा आवाज आला तसा पीयूष दचकला. ते निरीक्षण करत ओढ्यात उतरत होते. संदीप त्यांच्या सोबत होता.

______________________________





अकरा

“मग? तू कशी पुढे नेशील विकासची कहाणी?” नीलेशने सोनालीला उद्देशून विचारलं तेंव्हा ते गाडीशेजारी उभे राहून गप्पा मारत होते. पीयूष कॉन्स्टेबलसोबत पुष्कराज गेला होता आणि संतोष पोट मोकळं करण्यासाठी.

“विकास रात्री भुताच्या माळावर आला असणार. ‘धोंडो कुलकर्णीं’ना त्यांचं पत्र वाचून दाखवायला.” सोनाली गंभीरपणे म्हणाली.

“ए. काहीतरीच काय भंकस गं.” कल्पना करूनच आकांक्षाच्या अंगावर शहारे आले होते.

“ह्या... ह्या... ह्या... मस्त आहे गोष्ट. पुढे? पुढे काय झालं असेल? काय लिहिलं असेल त्या पत्रात?” नीलेश.

“त्या पत्रात एका गुप्त खजिन्याची माहिती लिहिलेली आहे. आणि आता विकास तो खजिनाच शोधायला निघाला आहे. धोंडोपंतांचं भूत त्यासाठी त्याला मदत करतंय.” आपला स्पेशल नाटकी हेल काढत सोनाली म्हणाली.

“अस्सं.... आणि तुला खरंच एखादं भूत भेटलं तर तू काय करशील गं?” विशाखा.

“मी... मी त्याला म्हणेन....” सोनाली पुढे काही म्हणणार तोच,

“आय लव यू सोनाली....” असा बाजूच्या झुडुपातून चिरका आवाज आला व त्याचबरोबर सोनालीच्या पायाजवळ काहीतरी येऊन पडलं. तशी ती मोठयाने किंचाळत बाजूला झाली. ते एक कुठल्या तरी प्राण्याच्या पायाचं हाड होतं. ते हाड पाहून सगळे दचकले.

“नुसतं एका हाडकाला घाबरलात. तुम्ही काय भुताला भेटणार? गाडीत बसवून परत नेऊन सोडू का पुण्यात? ह्या... ह्या... ह्या...” समोरच्या झाडीतून खिदळत येणारा संतोष म्हणाला. त्याचा हा आचरटपणा पाहून सगळ्यांनी त्याला धारेवर धरलं.

______________________________

भुताचा पोस्टमन Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ