16 & 17 भुताचा पोस्टमन

5 0 0
                                    

सोळा

“च्यायला... कुठं गायब झालं असेल हे म्हातारं एकदम?” नीलेश म्हणाला त्यावेळी तो व पीयूष कॉन्स्टेबल बरंच रान चालून आता दोन टेकड्यांच्या मधे पोहोचले होते.

“हो ना. काही कळायला मार्ग नाही. बरं आता दुपारचे बारा वाजत आलेत. आपण ‘दोन पांदी’त जायचं का काकडे साहेबांकडे? की ‘भुताच्या माळावर’ जायचं पुष्कराज व विशाखाकडे?” मनगटावरचं घड्याळ बघत पीयूष कॉन्स्टेबल म्हणाले.

“जाऊया कुठेतरी एकदाचं. पण सालं जायचं कसं तेच कळेनासं झालंय. म्हातार्‍याचा माग काढत कुठून कुठे पोहोचलो कुणास ठाऊक. नेटवर्क पण नाही मॅपवर शोधायला.” नीलेश अवतीभोवती पहात म्हणाला.

“एक दिशा धरून जाऊ सरळ. कुठेतरी पोहोचू की.” असं म्हणत पीयूष कॉन्स्टेबलने उत्तरेचा मार्ग धरला.

______________________________




सतरा

“काय रं पोरांनो.. कोणतं गाव हे?” दोन पांदीची सीमा दर्शवणार्‍या निवडुंगाच्या बांधाशी ते सगळे पोहोचले तेंव्हा त्या बांधाच्या आतल्या बाजूला खेळण्यात मग्न झालेल्या मुलांना संदीपने विचारलं. अचानक आलेल्या आवाजाने सगळ्या मुलांनी वर पाहिलं. आणि आपल्या गावात आलेल्या या अनोळखी पाहुण्यांकडे एकटक पाहत त्या मुलांनी काहीही न बोलता माघारी चालायला सुरवात केली.

“ही मुलं अशी का जाताहेत परत?” आकांक्षा जरा अस्वस्थ झाली, कारण ती मुलं जराही पापणी न लवता त्यांच्याकडेच पहात संथपणे उलटी उलटी चालत होती.

“हां.. गडबड आहेच काहीतरी. कारण ही मुलं बावरलेली नाहीत. तसं असतं तर ती वेगाने पळून गेली असती.” संतोषने आपले निरीक्षण मांडले.

“त्यांच्या नजरेत कसलीतरी हावरटपणाची झाक आहे.” सोनाली म्हणाली.

“जाऊ द्या ते. चला पुढं.” मुलं गावातल्या गल्ल्यांमधे अदृश्य झाल्यावर काकडे साहेब म्हणाले.


“आपण कदम हेडसरांचं घर विचरायचं का कुणाला? म्हणजे आपण पत्ता शोधतोय असं वाटेल.” सोनालीने शक्कल लढवली. निवडुंगाचा बांध ओलांडून ते आता बरेच पुढे आले होते. मात्र त्यांच्या पुढे पुढे येण्याबरोबर रस्त्यावरची एकएक हालचाल कमी कमी होत होती.

भुताचा पोस्टमन Where stories live. Discover now