15 भुताचा पोस्टमन

7 0 0
                                    

पंधरा

“मला वाटतं हाच तो ‘भुताचा माळ’ असेल आणि हेच ते जुनं पिंपळाचं झाड असणार.” पुष्कराज बोट दाखवून म्हणाला त्यावेळी ते बर्‍यापैकी पसरट असलेल्या एका टेकडीपाशी पोहोचले होते. टेकडीच्या साधारण मध्यभागी भलं थोरलं आणि अनेक शाखा असलेलं एक खूप मोठं झाड होतं. टेकडीवर सर्वत्र घोट्याएवढं गवत असलं तरी आश्चर्य म्हणजे दुसरं एकही झाड नव्हतं.

‘रामाबा... आपल्याला भेटलेल्या म्हातार्‍याचं नाव होतं रामाबा. विकास आपल्याशी बोलला तेंव्हाही त्याच्या तोंडून हेच नाव ऐकलं होतं. ‘रामाबा’च विकासलाही सांगत होता की, पुन्हा ‘दोन पांदी’त येऊ नको म्हणून. आपल्यालाही रामाबाने तेच सूचित केलं.’ विचार करत एका जागी थबकलेल्या विशाखाने एकदम,
“ए पुष्कराज. नको ना रे आपण आणखी पुढे जायला. समथिंग रॉन्ग इज देअर. रामाबा नको म्हणत होते इकडे यायला.” असं म्हणत पुष्कराजचा हात घट्ट धरला.

“ए वेडे... घाबरतेस काय अशी? आणि वाईट म्हणजे काय? अगं, भुतं-खेतं म्हणजे मनाचा भ्रम असतो नुसता.” तिला समजावणारा पुष्कराज जागीच खिळून उभा राहिला.

“बरं. असं करतेस का... मी एकटाच पुढे जाऊन येतो. आपण विकासला शोधायला आलोय की नाही? मग असंच परत जाणं योग्य ठरेल का? तू इथेच थांब. हे बघ, मी आत्ता गेलो आणि आत्ता आलो. ओके?” विशाखाची मनस्थिती पाहून पुष्कराजने तिला सोबत येण्याचा आग्रह न करता तिच्या हातातून आपला हात हळूच सोडवून घेतला त्यावेळी सकाळचे साडे-अकरा झाले होते.

“ए पुष्कराज. किती वेळ? बारा वाजायला पंधराच मिनिटं कमी आहेत.” विशाखा मनगटावरचं घड्याळ दाखवत ओरडत होती त्यावेळी पुष्कराजने पिंपळाच्या अवतीभोवती तीन फेर्‍या पूर्ण केल्या होत्या आणि आता त्याने पिंपळाच्या झाडाची दिशा धरली होती. विषाखाचं ओरडणं त्याला ऐकू गेलं नसावं कारण त्याने मागे वळूनसुद्धा पहिलं नाही. तो एकटक पिंपळाच्या पानांमधे काहीतरी शोधत होता. तो पिंपळाच्या बुंध्यापलीकडे दिसेनासा झाल्यावर विशाखा आणखीच घाबरली. तिने आणखी मोठयाने ओरडायला सुरवात केली.

भुताचा पोस्टमन Where stories live. Discover now