लाल इश्क 🌹 (05)

1.3K 21 3
                                    

माधुरी पाणी आणण्यासाठी घाईत किचन मध्ये गेली

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

माधुरी पाणी आणण्यासाठी घाईत किचन मध्ये गेली. भिती आणि दहशत नी तिची छाती जोरजोरात धडधडत होती. त्याच्या तोंडामधली गचाळ भाषा माधुरी ने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकली होती.त्या मुळे आतुन ती खुपच हादरली होती. आपण दरवाजा खोलुन खुप मोठी चुक केली होती. पाण्याचा ग्लास भरताना तिला हि गोष्ट लक्षात आली होती. दारात आलेल्या तहाण व्यक्ती ला पाणी नाकारणे माधुरी च्या संस्कारात बसत नव्हते. पाणी पिऊन हे संकट निघुन लवकरात लवकर निघुन जावे. माधुरी ला मनात सारखे वाटत होते. काही सेकंदाने माधुरी पाण्याने भरलेला ग्लास घेऊन घाई गडबडीत रुमच्या बाहेरील मोकळ्या जागेत आली होती. तो मनुष्य डोळे बंद करून भिती च्या आधाराने खाली बसला होता. एक जुनं हिंदी गाण तो गुणगुणत होता. माधुरी त्याच्या जवळ गेली. पण तो आपल्या दुनियेत मग्न होता. माधुरी असंमजस्य मध्ये होती की, त्याला कसे उठवावे..

शेवटी धीर धरुन माधुरी ने त्याच्या खांद्याला हात लाऊन हलवले. तसा तो व्यक्ती भानावरती आला. माधुरी कडे पाहत तो हसला आणि उभा राहण्यासाठी धडपड होता. पण काही केल्या, त्याला उभा राहता येत नव्हते. शेवटी त्यांने बसल्या जागी माधुरी च्या हाता मधुन पाण्याचा ग्लास घेतला. ग्लास मधले पाणी तो व्यक्ती ढसाढसा पित होता. माधुरी तिथे उभी राहुन त्याला रागाने बघत होती. पाणी पिऊन झाल्या वरती त्यांने ग्लास उचलुन माधुरी च्या हातात देण्यासाठी पुढे केला. माधुरी जशी ग्लास घेण्यासाठी हात वाढवला. त्या व्यक्ती ने तिचा मनगट घट्ट आवळुन पकडला. माधुरी च्या अंगावरती शेकडो साप चढल्या चा भास झाला. भिती ने तिच्या काळजाची धडधड वाढली. हद्याचे ठोक्यांनी अचानक वेग धरला. माधुरी भिती ने थरथरु लागली. मनात तिने देवाचा नाव घ्यायला सुरुवात केली.

लाल इश्कWhere stories live. Discover now