सारिका शाळेतुन घरी पोचली तेव्हा आदीला घेऊन तिची आई व्हरांड्यात येऊन फेऱ्या मारत होती. लिफ्ट मध्येच असताना सारिकाला आदीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. लिफ्ट मजल्यावर पोचताच तिने आदीला आपल्या जवळ घेतले.
आई: अग व्यवस्थित पाजून नव्हती गेलीस का.
सारिका: पाजलं होत आई ..काही कळत नाही हल्ली खुप भुक भुक करत असतो.
आई: अग..वाढती भुक आहे त्याची. तुला अंगावरच व्यवस्थित येत ना.
सारिका: हो ..पण ते पुरत नाही त्याला.
आई: हे बघ काही महिने अंगावरच ठेवायला लागेल. नंतर मऊ भात वैगरे चालु करता येईल.
सारिका: हो आई.
सारिका आदी ला घेऊन घरात आली. सोफ्यावर बसत तिने ब्लॉउजमधल्या स्तनाला बाहेर काढले. आदी लगेच निप्पल तोंडात घेऊन दुध पिऊ लागला.काही क्षणातच आदी झोपी गेला. तिने त्याला पाळण्यात ठेवले. आणि मोबाईल घेऊन निर्मला मॅडम नी सांगितलेल्या इमेल वर तिने सप्लिमेंट साठी मेल केला.
संध्याकाळी पाच वाजता विशाल ने तिच्या मोबाईलवर कॉल केला.
ट्रिंग ट्रिंग..
विशाल: हेलो ..माय स्वीटी
सारिका: हॅलो ..आज स्वारींचा मुड चांगला दिसतोय.
विशाल: येस..आज मी जाम खुश आहे.
सारिका: अचानक एवढं खुश होण्याच कारण कळेल का??
विशाल: आज ऑफिसिअली मला प्रोमोशन लेटर हातात मिळाल आहे.
सारिका: वाव.. काँग्रट्स..मिस्टर पतीदेव.
विशाल: काँग्रट्स टू यू ..बायको. मी पूर्ण वीकएंड फ्री आहे...आता.
सारिका: मग लवकर घरी या..नुसतं फोन वर का बोलताय.
विशाल: हो ..हो ..घरी तर लवकर येणारच आहे..त्यामुळेच कॉल केला..
सारिका: ओके..मग लवकर काम आटपा आणि या घरी.
विशाल: आणि ऐक ना?
सारिका: ह्म्म्म ..बोला.
विशाल: आज मस्त तयार होऊन रहा.
YOU ARE READING
सॉरी टीचर ..
RomanceMATURE CONTENT 18+ प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती. पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवल...