सॉरी टीचर.. CHAPTER- 4

10.4K 8 2
                                    

विशाल ने शाळेत सोडल्यावर सारिका उशीर होऊ नये म्हणुन घाईघाईत ऑफिस च्या दिशेने गेली. आतमध्ये प्रवेश करताच आपल्या बॅगेतले अपॉइंटमेंट लेटर तिने बाहेर काढले आणि ऑफिस मध्ये नजर फिरवू लागली. तिला काही स्टाफ टेबलापाशी घुटमटळत दिसला आणि एक विद्यार्थी फी भरण्यासाठी तिथे उभा होता. समोर टेबलामागे बसलेल्या एका क्लार्ककडे ती गेली आणि त्याच्याशी मधुर आवाजात संवाद साधु लागली.

सारिका: एस्क्युज मी ..सर ..आय एम सारिका..

एक चाळीशीतला गृहस्थ रजिस्टर मध्ये काहीतरी लिहीत बसला होता. एवढ्या मधुर आवाजाचा धनी कोण हे पाहण्यासाठी त्याने डोके वर काढले.

क्लार्क: येस मॅडम ...व्हाट् कॅन आय डु फॉर यू ?

सारिका: येह ..आय केम टु जॉईन..आज माझी जॉइनिंग डेट आहे. हे माझ...अपॉइंटमेंट लेटर.

सारिकाला लक्षात आले की ऑफिस मधला सर्व स्टाफ आपले हातातले काम थांबवून तिच्याकडेच पाहत होता. तिने सगळ्यांकडे पाहत एक मोहक स्माईल दिली.

क्लार्क: ओह ..ओके .वेलकम टू बिर्ला पब्लिक स्कूल ...कुठला विषय तुम्ही शिकवणार आहात.

सारिका: विषय नाही ...मी येथे स्टुडन्ट कौन्सिलर म्हणुन आले आहे.

क्लार्क: ओह ..येस.. येस ..प्रिंसिपल सर बोलले होते ..ह्या पोस्ट साठी नवीन अपॉइंटमेंट येणार आहेत ते ..असे म्हणत त्याने तीला स्माईल दिली आणि अपॉइंटमेंट लेटर चेक करू लागला.

सर्व औपचारीकता पुर्ण होईपर्यंत सारिका तिथे वाट बघत राहिली. एका नजरेने कटाक्ष टाकत आजूबाजूला बघितले असता तीला एक विद्यार्थी आल्यापासुन एक टक तिच्याकडे पाहताना दिसला. तिला अशा लोकांच्या नजरेची सवय होती. त्यांचा राग पण तीला यायचा. पण तिला माहिती होते अशा लोकांना बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. ती फक्त त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना टाळत असे. पण तिने १६-१७ वर्षाच्या विद्यार्थ्याकडून हे अपेक्षित केले नव्हते. तो वयाने खूपच लहान होता. एवढा लहान मुलगा एका स्त्री कडे अशा नजरेने कसा पाहू शकतो. त्या रूममध्ये कोणाचीही पर्वा न करता ओशोळतेने तो तिच्याकडे पाहत होता.

सॉरी टीचर ..Where stories live. Discover now