सॉरी टीचर.. (प्रस्तावना)

32.4K 53 7
                                    

प्रस्तावना

सारिकाचा जन्म एका पारंपरिक साध्या मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटूंबात झाला होता. तिचे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांचे त्यांच्या समाजात नाव होते. आई वडलांना समाजात मिळणारा सन्मान आणि आदर बघुन तिची ही लहानपणापासून शिक्षक होण्याची महत्वाकांशा मनात निर्माण झाली म्हणुनच समाजात तिने एक आदर्श शिक्षिका बनून लोकांच्या मनात एक ठसा उमाटवण्याचे तिने स्वप्न पाहिले. वाढत्या मुलांच्या मनावर प्रभाव टाकून त्यांना एक सुंदर आयुष्य देण्याचे तिने मनात निश्चित केले.त्यामुळे तिने ग्रॅज्यूएटनंतर स्टुडन्ट कौन्सिलिंग च प्रशिक्षण घेऊन एका स्थानिक शाळेमध्ये नोकरी मिळवली. डिग्री चे शिक्षण घेताना तिचे विशाल बरोबर लग्न झाले आणि एका वर्षातच ती छान गोंडस बाळाची आई झाली.

विशालला एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजरच्या हुद्दयावर चांगल्या पगाराची नोकरी होती. तो सुद्धा एका प्रतिष्ठित कुटुंबात वाढला होता. दोघेही आपल्या कुटुंबाच्या नीती मूल्यांना अधिक महत्व देत असल्यामुळे साहजिकच अरेंज मॅरेजाच्या माध्यमातून त्यांचे नातं जुळले गेले. विशाल मनाने प्रेमळ, हसमुख, आपल्या पत्नीचा आणि तिच्या मतांचा आदर करणारा व्यक्ती होता. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे सारिका ही त्याच्यावर मनापासून प्रेम करायला लागली.दोघांचाही राजा रानी सारखा सुखाचा संसार चालु होता.

सारिकाचे सौंदर्य अगदी सुंदर, मोहक आणि दुसऱ्याच्या मनावर भुरळ टाकणारे होते. तरुण असो वा कुठल्याही वयाची व्यक्ती तिच्या रूपाने सहजरित्या मंत्रमुग्ध होऊन जात असे. क्लासिकल डान्सच्या नियमित सरावामुळे तिच्या शरीराची मांडणी अगदी आकर्षक झाली. तिचे कातिल डोळे अगदी बोलके होते जणू त्यामधुन विश्वातील सर्व नद्या, समुद्र, निसर्गाचा आभास होत असे. तिची काळेभोर केस तिच्या प्रत्येक शारीरिक हालचालीबरोबर सूर्याच्या सोनेरी प्रकाशात चकाकत असे. तिच्या रसिल्या ओठाच्या फुललेल्या कळीचा आकार गोऱ्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. ह्या आकर्षक कमनीय देहाची रचना वेळेचे बंधन न जुमानता फुरसत मध्ये निर्माण केली होती.

प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही नोकरी स्वीकारली होती.

पण तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय आहे हे भोळ्या मनाच्या सारिका ला माहिती नव्हते.

Follow me on instagram- sheetalmody9

सॉरी टीचर ..Where stories live. Discover now