संध्याकाळचे ५.३० वाजून गेले होते. राहुल आणि आकाश दरवाज्याकडे टक लावुन विकी ची वाट पाहत होते. आतापर्यंत विकी आणि सारिकामध्ये घडु शकणाऱ्या सर्व शक्यतांची चर्चा दोघांमध्ये झाली. त्यासाठी ते दुपारचे जेवण सुद्धा विसरले. त्यांचे चित्त सतत एकाच गोष्टीचा विचार करत होते की विकी आणि सारिका मध्ये भलत सलत काही घडु नये. दोघांचाही चेहरा खूपच केविलवाणा झाला होता. आपण सारिका बदल असा का विचार करतोय हे त्यांनाही कळत नव्हते. ही नक्की कसली भावना आहे. त्यासाठी तहानभुक विसरून सतत आपण तिचाच विचार करत आहोत. त्यांची बेचेैनी वाढत चालली होती. सेक्स हा शब्द नव्याने जेव्हा त्यांना समजला होता तेव्हा प्रेम ह्या शब्दापासुन ते पूर्णपणे गाफिल राहिले होते. आणि आता मात्र ते नकळत का होई ना सारिकाबद्दल प्रेमाची पालवी त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नव्याने फूटत होती.
शेवटी ६.४५ वाजता त्यांना कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. दोघेही उठले आणि दरवाज्यात जाऊन पाहु लागले. विकी कॉरीडोर मधुन येताना त्यांना दिसला. त्यांची प्रतीक्षा संपल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला. त्याचबरोबर सत्य जाणुन घेण्याची चिन्ता ही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
आकाश आणि राहुल समोरून येणाऱ्या विकीकडे धावत धावत गेले. धापा टाकत टाकत राहुल ने त्याला थांबवून विचारले.
राहुल: उह..ह्ह्ह ..मित्रा किती वाट पहातोय यार ?
विकीने बघितलं न बघितल्यासारखे केले. आणि पुढे चालत राहिला.
विकी: काय झालं? तुम्हाला काही सांगायचं आहे का?
राहुल: नाही ..तु आम्हाला प्रॉमिस केल होतंस ...तुच आम्हाला सर्व सांगणार होतास.?
विकी: काय सांगणार होतो ?
राहुल खुप उतावळा झाला होता. तो विकी ला बोलत करण्यास प्रयत्न करू लागला.
राहुल: आता नाटक करणं बंद कर ...प्लिज सांग ना यार ...काय घडलं तुमच्यामध्ये?
YOU ARE READING
सॉरी टीचर ..
RomanceMATURE CONTENT 18+ प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती. पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवल...