सॉरी टीचर .. CHAPTER- 23

7K 13 3
                                    

विशालची गाडी बरोबर चार वाजता मॉल च्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहचली. सारिकाने गाडीचा दरवाजा उघडुन बाहेर आली.

सारिका: चला बाय ...मी निघताना तुम्हाला फोन करेन.

विशाल: डोन्ट वरी डार्लिंग..तुमचा ड्राइवर ८ वाजता तुमच्या सेवेत हजर असेल.

सारिका: हाहाहाहा..गुड ..आदीची काळजी घ्या. जास्त रडत असेल तर लगेच फोन करा. मी ताबडतोब निघेल..

विशाल: तु आदीची काळजी करू नकोस..पार्टी झाल्यावरच फोन कर..चल बाय

सारिका: बाय बाय

**********************************

विशाल जाताच सारिकाने आपला मोबाईल पर्समधुन काढत राहुलचा नंबर डायल केला.

सारिका: हॅलो .

राहुल: हॅलो..मॅडम..कुठे आहात तुम्ही.

सारिका: मी येथे मॉलच्या एंट्रन्सवर आहे.

राहुल: अच्छा तिकडेच थांबा..मी गेटजवळ आलो.

सारिका: पण तु कुठे आहेस.

राहुल: मी येथे BEBE शोरूम मध्ये आहे ..तुमच्या साठी ड्रेस चेक करत होतो.

सारिका: अच्छा..मी येते तिकडे..कुठल्या फ्लोअरवर येऊ ते सांग.

राहुल: ओके..सेकंड फ्लोअर या. VAN HUESEN च्या बाजुला.

सारिका: ओके..आलेच मी.

सारिका चढत्या जिन्यावरुन दुसऱ्या मजल्यावर आली. डाव्या बाजूला वळताच तिला राहुल उभा असलेला दिसला. BEBE शोरूम च्या बाहेर तो तिची वाट बघत होता. सारिकाला पाहून राहुल तिचे सौंदर्य नुसतं न्याहळत होता.

राहुल: वाव ..मॅडम, ह्या साडीत कसल्या भारी दिसता तुम्ही.

सारिका: ओह ..थँक यु ..आणि तु मला मॉडर्न ड्रेस घालायला सांगतोयस.

राहुल: त्या ड्रेस मध्ये सुद्धा तुम्ही भारी दिसाल.

सारिका: अग बाई ..तुम्ही मुल अगदी वात्रट झालात.

राहुल सारिकाला नुसतं बघुन हसत होता.

सारिका: बाय द वे..हॅपी बर्थडे.

सॉरी टीचर ..Donde viven las historias. Descúbrelo ahora