01. पहाटेचे 3

376 3 0
                                    


प्रिय आई आणि बाबा,

आपण एकाच घरात राहतो आणि मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तरीपण मी हे पत्र तुम्हाला लिहिले आहे. सध्या 2012 चालू आहे मोबाइल फोन आपल्याच घरी आहे. पत्र वैगेरे सगळं जून झालं असलं तरीही मला जे सांगायचं आहे ते लिहायला दुसरा कोणताच पर्याय माझ्या नजरेसमोर दिसला नाही. यावर्षी मी बारावीला होते त्यात माझे चांगले गुण काही मिळाले नाही. यात नक्कीच सम्पुर्णतः माझी चूक नव्हती. चूक नसताना ही आईने मला नाही नाही ते सुनावले. बारावी झाल्यावर बाबा मला नवीन फोन घेऊन देणार होते. परंतु आईनेच माझ्याविषयी भडकवल्यामुळे फोन तर दूरच राहिला साधी शाब्बासकी सुध्दा दिली नव्हती. खरतर हे आश्चर्यच आहे. खरंच मी तुमचीच मुलगी आहे का? माझ्या सुद्धा मैत्रिणी आहेत. मित्र सुध्दा आहेत. त्यांना कमी गुण मिळाले म्हणून त्यांना त्यांच्या पालकांनी फटकारून असे तरी वागले नव्हते. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 'तुमची मुलगी इतकीच बुद्धिमान आहे. अपेक्षा ठेवणं बंद करा.'

पत्र लिहिण्यामागे हेच कारण नाही. माझ्या गुणवत्तेने मी बारावी झाले. शिकता शिकता मी 17 वर्षाची झाले. हे वय काही कमी नव्हते. मी काही आता शाळेत नव्हते. अकरावी बारावी करणाऱ्या कॉलेज ला सुद्धा नव्हते. मी लहान राहिले नाही. मी मोठी झाले होते. माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकत होते. मी निवडणुकीत मत देऊ शकणार मग निर्णय तर घेणारच. तसेही लहानपणापासून घेतलेले तुमचे निर्णय तरी काही इतके महान नव्हते. त्याविषयी आपण काहीही न बोलेलच बर आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे कि मी एक निर्णय घेतला आहे. कितीही कठीण असला तरीही तुम्हाला तो मान्य करावा लागेन. या घरात मी एकुलते एक अपत्य आहे. लहानपणापासून माझ्या इतक्या जवळचे कोणीही नव्हते. मी कॉलेजला गेले तेव्हा मी माझ्या या विश्वात आले. जिथे माझे मित्र, मैत्रिणी आणि आमची फक्त मस्ती होती. त्यातच माझा एक मित्र होता. तो कोण होता हे सांगितले तर नक्कीच तुम्ही त्याला छळणार. म्हणून मी तो कोण आहे हे सांगणार नाही. पण तो माझ्यापेक्षा वयाने आणि हुशारतेने मोठा आहे. तुमच्या सततच्या ओरड्यातून आणि जवळच्या व्यक्तीच्या अभावातून जे मला मिळत नव्हतं ते प्रेम मला त्याने दिले. त्याने माझ्यावर जीवापाड प्रेम केले. मुलगा स्वभावाने खूप चांगला आहे. तुमच्या मुलीला आवडतो हेच महत्वाचे आहे असं समजून मी तुमचा होकार समजते आणि आजपासून त्याच्यासोबत मी माझ्या नवीन, सुंदर आणि स्वच्छन्द आयुष्याला सुरुवात करते. हे पत्र तुम्ही वाचत असणार म्हणजे नक्कीच मी या घरी नाही हे तुम्हाला कळले असणार. त्यामुळे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी लहान मुलगी नाही. या जगात मला फसवू शकणारा माझ्या नजरेसमोर येणार नाही. त्यामुळे कसलीही काळजी करू नका आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. बाबांचा दूरध्वनी क्रमांक मला पाठ आहे. मी सुखरूप आणि निवांत असल्यावर तुम्हाला कळवेन.

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now