शेवट

37 0 0
                                    

शेवट

शेवटी वीणा तिच्या घरी पोहोचली.

या प्रवासात तिने काय शिकले? तिला तिचे स्वंतत्र मिळाले का? माझ्या मते ते स्वतंत्रच काय ज्यात आपण स्वतःच स्वतःला कोणत्याही बंधनात बांधून ठेवत नाही. ज्याप्रमाणे मुलगी स्वतंत्र झाली म्हणजे ती तिची लाज सोडून कसलाही विचार न करता राहणे हे मुळीच नव्हे. मुलगा स्वतंत्र झाला म्हणजे आपल्यावर कोणाचे बंधन नसल्यामुळे आपण कसेही वर्तन आणले किंवा कसलेही सेवन करावे असा सुद्धा होत नाही. बंधन तर असावेच. आई वडिलांचे, नातेवाईकांचे, शिक्षकांचे किंवा समाजाचे बंधन नाही तर स्वतःचेच बंधन असावे. तेव्हा कुठे त्या स्वातन्त्र्याला अर्थ लागतो. माझ्या या व्याख्याच्या मते वीणाला स्वतंत्र मिळाले. या जीवनाच्या शिकवणीत तिला अनुभव रुपी फार चांगले शिक्षण मिळाले. अनुभवात तिला फार मोठी किंमतही चुकवावी लागली. क्षणाक्षणाला तिला लढावा लागले होते. कारण तो संघर्ष होता.

शेवटी तिला स्वतंत्र्यासोबत संघर्षाचेही धडे मिळाले. आपण नाजूक असून चालणार नाही. आपल्याला जिंकायचे असेल तर संघर्ष कोणत्याही किंमतीत करावाच लागेल. सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी कधीही थांबणे जमणार नाही. बरोबरच आहे. आपण यासाठी इतकी मेहनत केली असताना असे थांबणे सोपे असते का! म्हणजे इतकी मेहनत वाया घालवायची का? नाही. भुकेने जीव जायची वेळ आली तरीही संघर्ष करणारच.

सर्वात महत्वाचं प्रेम, क्षणिक प्रेम नाही. 2 मिनिट डोळे बंद करून नजरेसमोर कोणाचा चेहरा येतोय हे प्रेम ओळखण्याचे साधन नव्हेच. कोणाच्या सहवासाने आणि कोणाच्या फक्त असण्याणेही हृदयाला अधिक आधार जाणवतो! हृदयाला मायेची उब मिळते! कोण आहे ती व्यक्ती? खरंतर तीच खरं प्रेम करते. कारण अशीच व्यक्ती फिरून प्रेम करते. मला वाटत नाही वीणा परत कधी खोट्या प्रेमात पडेल. या अश्या प्रेमाच्या आमिषाला तर ती मुळीच पुढे जाणार नाही.

शेवटचे म्हणजे निर्णय! मोठे होण्याचे महत्वपूर्ण संकेत म्हणजे निर्णय. लहानपणी आपण कधीही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. पण मोठेपणी आपल्याला ते घ्यावेच लागतात. ज्या क्षणी स्वतःचा पहिला निर्णय घेणार त्यादिवशी आपले लहानपण हरवले असणार. निर्णय सुद्धा अविचाराने घेता येत नाही. निर्णय असा घ्यावा कि पुन्हा कधीच त्यावर पश्चाताप होणार नाही. वीणा लहान होती. पण तिला वाटले कि ती हे करू शकते. म्हणून तिने अविचाराने पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिला पुढे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले.

जेव्हा ती घराकडे परतते तेव्हा मात्र तिने एक गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे, 'झालं गेलं ते गंगेला मिळालं!' काही गोष्टी फार सध्या असतात परंतु महत्वपूर्ण असतात. जीवनाचे तत्व बांधू शकणार अश्या असतात. ज्याप्रमाणे तिने ऐकलेले ते भजन, 'जगी जीवनाचे सार.' आणि त्याने ऐकलेले ते गाणे. छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता येतं. फक्त शिकण्याची तय्यारी असायला हवी. आयुष्य आपल्याला अनेक संधी देणार पण शेवटी एखाद्या खेळाप्रमाणे त्या संधीचाही शेवट होणार. त्यामुळे आपण सर्व काही ठीक करू शकत नाही आणि जे आता मिळालं आहे ते परत मिळेल असे नाही.

तिला अक्कल आली आणि त्याला कारणीभूत होते ते म्हणजे 'संघर्ष' आणि तो चुकीचा निर्णय!

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now