रात्रीचे 9
कोणत्यातरी गजर ने माझी झोप मोडली. जेव्हा मी उठले तेव्हा सुद्धा अंधार होता. मी अजूनही गाडीत होते. कोणीतरी माझा हात पकडला होता परंतु त्या व्यक्तीलाच झोप लागल्याने हाताची पकड हलकी होती. फक्त गाडीचा चालक जागा असावा. मध्ये फडका असल्याने मला काहीही दिसत नव्हते. माझ्या बाजूला कोण असावे माहित नाही. फक्त स्पर्श जाणवत होता. माझ्या बाजूला कोणीतरी बसले होते. गजर वाजताच चालकाने तो बंद केला असावा. जे काही होते ते स्वप्न नव्हते. मला समजले, माझे अपहरण झाले. पहिलाच विचार माझ्या मनात त्या घाणेरड्या माणसाचा आला. ज्याला फसवून मी पळाले होते. होय! हे त्याचेच काम असावे. परंतु जर हे त्याचे काम असते तर तो सुद्धा इथे असता. सांगता नाही येणार कदाचित त्याचीच माणसं असावी. मला तरी कुठे माहित माझ्या बाजूला कोण बसले आहे.
मी घरापासून फक्त काही अंतरावर होते. एकदा माझ्या आईबाबांना पाहिले असते तर किती बरे झाले असते. आता काय करायचे आपण? मला जर खरंच स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे जाऊन विकले तर? काय होणार माझे पुढे? टीव्ही मध्ये असेही भरपूर कार्यक्रम दाखवतात ज्यात मुलीचे काय काय नाही होत! जर मला विदेशात विकले तर? मी घरी परत येऊच शकणार नाही. जर मला एखाद्या घाणेरड्या कामासाठी वापरले तर? आता यात जर-तर कसले! मुलीचा उपयोग कश्यासाठी करणार! नक्कीच स्वतःची कधीही न मिटणाऱ्या पुरुषी भूक भागवण्यासाठी! मुलीचा विचार केला आहे का कधी? मी माझ्या उरलेल्या आयुष्यात फक्त हे घाणेरडे कामच करायचे का? तेच करत मरण पत्करायचे का? नाही वीणा! मी हे असे आयुष्य कसे जगणार? पण हा विचार मी प्रियेशच्या घरासमोर मिळेल ती बस पकडण्याआधी का नाही केला? मी काय करायचे आता? तितक्यात गाडी थांबली. मी झोपण्याचे नाटक केले. यावेळी मला चांगली युक्ती करावी लागणार जेणे करून मी सरळ माझ्या घरीच पोहोचू शकेल. गाडीचा चालक हलक्या हाताने फडका दूर करून मागे बघू लागला. त्याचे असे करताना समोरचा प्रखर उजेड माझ्या डोळ्यावर आला. हलक्या नजरेनेही मी त्याला पाहू शकले नाही. त्याने पुन्हा फडका तसाच ठेवला आणि तो गाडीतून उतरला. माझ्या मनात आले की सर्व जण झोपलेले असताना आपण हळूच पळून जाऊ या. मी तो फडका हलकाच काढला आणि समोर जाण्याचा प्रयत्न करू लागले तितक्या मागे बसलेल्या एका व्यक्तीने माझा गळा मागे ओढला. हलकाच पण हळू हळू घट्ट करत तो माझ्या कानाकडे ओठ करून दबक्या आवाजात म्हणाला, 'तुझ्यावर कोणाची ना कोणाची नजर आहेच. विचारही करू नको.' असे म्हणून त्याने माझे केस धरून ठेवले. मी जरा जरी हलले तरी माझे केस जोरदार खेचले जायचे. माझ्या बाजूला बसलेले नक्की का इतके गाढ झोपी गेले होते मला समजत नव्हते. माझा ओरडा ऐकून किंवा माझी चुळबुळ बघून कोणीही उठत नव्हते. माझे खेचले जाणारे केस माझा हा अनिर्णित प्रवास आणखीन असहनीय करत होते. सम्पूर्ण गाडीत एकसारखा काळोख पसरला होता. काहीही केल्या डोळ्यांना प्रकाश मिळेना. त्यात माझ्या पाठी बसलेल्या व्यक्तीचा हात केसांवरून हळू हळू माझ्या गळ्याकडे आला होता. मला तो स्पर्श जाणवला. मी तो ओळखला. तो अंधाराचा फायदा घेत होता. परंतु त्याने माझा गळा धरला होता. मी काहीही बोलू शकत नव्हते. मी माझा एक हात सोडवून त्याचा गळ्यावरून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अगदीच घट्ट नाही पण पकड काही केल्या त्याला सुटू द्यायची नव्हती. पुन्हा तो माझ्या कानाजवळ आला आणि हलक्या स्वराने म्हणाला, 'हालचाल करू नको. दुसऱ्या हातात ब्लेड आहे. तुझे काही झाले तर या गाडीबाहेर कोणाला समजणार सुद्धा नाही.' मी माझा हात हळूच त्याच्या हाताला धरून ठेवला. मी घाबरले होते. वेळ जाईल किंवा त्याचा स्पर्श होईल तसे तसे आणखीन घाबरत होते. माझ्या मागे कोण बसला आहे? त्याने मला इजा पोहोचवली तर ? शस्त्र आहे त्याच्याकडे. ही गाडी कुठे चालली आहे? कोणी आहे कि नाही? मला वाचवा! ओरडू सुद्धा शकत नव्हते. भुकेने, भीतीने आणि त्याच्या सहवासाने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दरारा इतका की मी ते पुसू सुद्धा शकत नव्हते. त्याला जाणवताच तो माझ्या कानाजवळ येऊन हसू लागला आणि माझा गळा आणखीन घट्ट धरला. माझा श्वास अडकला. श्वास मला घेताच येत नव्हता. मी हालचाल न करता प्रयत्न करू लागले. शेवटी मी जोरजोरात श्वास घेऊ लागले. मी हलकेच बोलू लागले, 'सोड! मला सोड! श्वास...' परंतु तो माझा गळा सोडत नव्हता. तो आणखीन हसत होता. हे असेच काही वेळ चालू राहिले असेल. नन्तर गाडी थांबली. गाडी थांबताच त्या व्यक्तीने माझ्या चेहऱ्यावर एक जाड कापडी पिशवी टाकली. त्यात सुद्धा श्वास कोंडलाच होता परंतु माझा गळा त्याने सोडला होता. मला जरा बरे वाटले. त्याने एका सुतळीने माझा गळा बांधला. ते सुद्धा त्रासदायकच होते. माझा इथे जीव जाणे निर्णीत होते. मला ते सहन होत नव्हते. माझा गळा सतत दाबला जात होता. समोर काहीच दिसत नव्हते. कोणीतरी माझे हात बांधले. माझ्या मनाला वाटले असते तर मी लढू शकत होते. पण मी जरा जरी हलले तरी माझ्या गळ्याला ताण पडायचा. मला वाटते माझी आजची लढाई इथेच सम्पेन.
ESTÁS LEYENDO
24 - आठवणीतील तास
Misterio / Suspensoवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...