20. रात्रीचे 10

46 1 0
                                    

रात्रीचे 10

मी खिडकीकडे बसले होते. त्याची धाड धिप्पाड चाल मला जाणवत होती. तो भलत्याच आरामाने माझ्याच दिशेने चालत येत होता. तो खाली जमिनीवर माझ्या समोर बसला असावा. हलकेच त्याने माझ्या चेहऱ्यावरील पिशवीची दोरी सोडली. मला वाटले आता तरी मला त्याचा चेहरा दिसेल. तो कोण आहे हे कळेल. आपण कुठे आहोत हे कळेल. त्याने माझ्या चेहऱ्यावरील पिशवी हलकीच काढली. काढता काढता तो म्हणाला, 'इतकी कोवळी मुलगी एका खोलीत असताना मला हा मोह आवरत नाही.' त्याचा आवाज दमदार होता. त्याच्या शब्दात माझ्यासारख्या मुलीला भीती वाटेल इतकी ताकद होती. किंबहुना मला त्याच्या प्रत्येक शब्दासरशी भीती सुद्धा वाटत होती. आतापर्यंत माझ्यासोबत जे काही घडले होते त्यात माझ्यासोबत माझी जिद्द होती. माझे धाडस होते. परंतु आता त्याच्यासमोर ते काहीच टिकून राहत नव्हते. माझ्या चेहऱ्यावरील पिशवी निघताच मी डोळे मिचकवत समोर बघण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे त्या गाडीत अंधार होता त्याचप्रमाणे त्या खोलीत अंधार होता. काळा कुट्ट अंधार. मी त्याच्या आवाजावरून, स्पर्शावरून आणि श्वासाच्या जाणिवेवरून तो किती दूर किंवा जवळ असावा हे जाणून घेत होते. मला अंधारातच पाहता तो माझी प्रशंसा करू लागला, 'वाटलेलं त्याहून अधिक सुंदर आहेस तू. जर तू माझ्याकडे आयुष्यभरासाठी राहिली असती तर!'

मी काही बोलूच शकत नव्हते. त्याला मी दिसणे कसे शक्य होते? मला तर इथे एकही वस्तू दिसत नाही. अधिक काळ डोळे बंद असल्याने कदाचित मला कमी दिसत असावे. मी पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच! मला काहीच दिसत नव्हते. आता मात्र प्रचंड भीती वाटू लागली. माझ्या डोळ्यांना काय झालं? मला काहीच का दिसत नाही? 'तुला राणी बनवून ठेवलं असतं!' मला त्या घाणेरड्या माणसाची आठवण आली. हा तोच आहे का? त्याला इतकं मराठी बोलता येत नव्हतं. हा व्यक्ती शुद्ध आणि स्पष्ट मराठीत संवाद साधत होता.

'तू तू कोण आहे.' मी घाबरत घाबरत कुजबुजले. त्याने माझ्या अगदी जवळ येऊन माझ्या कानाजवळ येऊन उत्तर दिले, 'मी कोण आहे ते सोड. तू तर माझी आहे.... आज रात्रीसाठी!' मी शक्य तितक्या मागे सरकले.

24 - आठवणीतील तासOnde histórias criam vida. Descubra agora