रात्रीचे 8
माझे डोळे उघडले ते अनुजच्या मांडीवर झोपलेले असताना. अचानक तो जास्तच सुंदर दिसत नव्हता का? त्याच्या चेहऱ्यावरील तेज वेगळेच भासत होते. वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात चकाकत होती. त्याचा माझ्या गालावरून फिरवणाऱ्या हाताचा स्पर्श थंडगार वाटत होता. अलगद डोळे उघडून मी हळुवारपणे त्याला विचारले, 'कुठे आहोत आपण?'
हलकेच हसत तो म्हणाला, 'तू माझ्या जवळ आहे. आपल्या जगात.' ते ऐकून अंगावर रोमांच उभारले. त्याचे प्रेम जाणवू लागले. मी त्याच्या डोळ्यात पाहत हसले. तिथून उठावेसेच वाटत नव्हते मला. प्रयत्नसुद्धा करावेसे वाटत नव्हते.
'अनुज!'
'म'
'तुझ्याकडे असेच बघत राहावेसे वाटते मला.'
'म' तो फक्त हसत होता.
'लोक म्हणतात की तुझा मृत्यू झाला आहे.' काय! मला सर्व काही आठवले. मी हे काय बडबडते? अनुज चा मृत्यू? त्याने मला धरून ठेवले. मी उठु सुद्धा शकत नव्हते.
मी घाबरले, 'हे काय आहे? उठू दे मला. तू माझ्यासमोर कसा काय आला?' त्याने मला स्वतःच्या थंडगार हाताने आणखीन घट्ट पकडून ठेवले. काहीही न बोलता तो सरळ माझ्या नजरेत बघू लागला. मी स्वतःच तिथे व्यर्थ प्रयत्न करत होते. अचानक मी पुन्हा खूप थकले. माझे डोळे मिटू लागले. परंतु ते मिटत नव्हते. तितक्यात माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी थंडगार पाणी मारले आणि मी खडबडून त्या अडकलेल्या स्वप्नातून बाहेर पडले. मी बस स्थानकावर एका बाकड्यावर झोपले होते. काही कर्मचाऱ्यांनी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारले होते. खाकी रंगाचे गणवेश घातलेल्या माझ्या वडिलांच्या वयाच्या चालक काकाने माझी विचारपूस केली, 'बाळा आता कस वाटतंय तुला?' मी स्वतःची नजर सांभाळण्याचा प्रयत्न करू लागले. डोळ्यासमोरून अंधार गेल्यावर मी फक्त होकारार्थी मान हलवली. त्यांनी मला 5 रुपये वाला पार्ले जी देऊ केला. 'तुला कुठे जायचे आहे? तू घर सोडून पळून आली का? तुझी अवस्था बघून खूप दया येत आहे.' ते विचारपूस करत होते ज्यावर मी उत्तरही देऊ शकत नव्हते. मी अजून ही त्या स्वप्नात असावे. मला अनुज चा स्पर्श अजूनही जाणवत होता. डोळे अजूनही मिटावेसेच वाटत होते. मी डोळे मिटताच पुन्हा माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे थेम्ब पडले. मी खडबडून डोळे उघडले. तो स्पर्श, तो भास, सारा क्षणात नाहीसा झाला. मी थितरबितर त्याला शोधू लागले. फोन वर झालेला संवाद आठवतच मी कपाळाला हात लावला. ज्यासाठी मी इतका विचार करत होते ते अन्न माझ्यासमोर होते तरीही मला ते नको होते.
YOU ARE READING
24 - आठवणीतील तास
Mystery / Thrillerवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...