२ शब्द

437 2 0
                                    


एक नवीन आव्हान घेऊन मी हे पुस्तक लिहत आहे. तर हे पुस्तक रहस्यमयी आणि रोमांचक असणार आहे. नेहमीच आपले आयुष्य अगदीच सरळ सुरळीत चाललं असतं. परंतु कधी आपण स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतो किंवा आयुष्याचे वळण म्हणून कसलीही चूक नसताना काही संकट डोक्यावर येतात. संकट आहे तेव्हाच त्यावर उपचार आहे. संकट आहे तेव्हाच गरज आहे. हेच संकट असतात ज्यामुळे आयुष्यात गम्मत आहे. ययाती मध्ये सांगितल्याप्रमाणे, 'आयुष्यात काही गोष्टी अपूर्ण आहे आणि त्यातच त्याची गोडी आहे.' माझ्या मते कोणीच सर्वगुण सम्पन्न नाही. कोणीच अगदी नशीबवान नाही. जर तस असतं तर आयुष्य किती निरस असतं.

या पुस्तकाची नायिका वीणा, तिच्या मते आपल्याकडे जे नाही तेच तिला हासील करायचं आहे. जे तिला वाटतं कि तिच्या आयुष्यातून गैरहजर आहे ते म्हणजे प्रेम तेच तिला हवं आहे. ती 16-17 वर्षाची मुलगी आहे. तिच्यामते ती काही लहान मुलगी नाही. त्यामुळे ती स्वतः स्वतंत्र आहे. तिचे विचार स्वतंत्र आहे. तिला मागे वळून बघायला आवडत नाही. सगळं चांगलं चालू असताना ती एक निर्णय घेते ज्यात तिचे आयुष्य 24 तासासाठी बदलते.

या कहाणीच्या दुसऱ्या बाजूला आहे तिची आई. सर्व आईंप्रमाणेच आपल्या अपत्यावर अमर्यादित प्रेम करणारी. मुलीच्या चुकीला ती कशी सुधारते आणि सुधारताना तिचे काय होणार आहे हे तर पुढेच समजेल.

या कहाणीमध्ये एक पात्र आहे अनुज. वीणा चा बालपणीचा मित्र. तिचे आणि त्याचे काय धागे दोरे आहेत हे तर आपल्याला पुढेच समजेल.

या पुस्तकाचा उद्देश नक्कीच मनोरंजन करणे हा आहे. दुसरा उद्देश म्हणजे घाई गडबडीत असे निर्णय घेऊ नका जे नन्तर सर्वांनाच जड जातील. तिसरा उद्देश म्हणजे स्वार्थी बनू नका.

हे शेवट पर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.

24 - आठवणीतील तासOù les histoires vivent. Découvrez maintenant