(वीणाच्या घरी आईच्या नजरेतून)
आजची सकाळ फार विचलित करणारी जाणवत होती. मी आज 6 च्या आधीच उठले होते. आजकाल आम्ही वीणासोबत फारच कडक वागतो. आता मी तरी हे सार बदलायला नको का? यांच्यामुळे मला सुद्धा हे जमत नाही. या घराचा नियम म्हणजे नियम! सकाळी 6 वाजता मी त्यांना उठवले. काही वेळाने मी उगाचच तिला उठवायला जाणार. काहीही झाले तरीही ती तिच्या मर्जीने तिचे बाबा गेल्यावरच उठणार. ते कामावर जाण्याआधी मला सारी काम करायला लागणार. अरे हो! कालच मी वीणासाठी गाजराचा हलवा करायचे ठरवले होते. लवकर तयारीला लागू या. आज तर ती या सुगंधानेच जागी होणार. हा विचार करून उत्सुकतेने मी फ्रीझ मधून गाजर बाहेर काढून ठेवले.
तिला अधिक थन्डी लागू नये आणि नियम म्हणून तिच्या खोलीत तिला उठवायला गेले. खोलीचे दार आज माहित नाही का परंतु उघडेच होते. ती नेहमीप्रमाणेच स्वतःला पांघरुणात कोंडून झोपली होती. मी पंखा बंद केला आणि हलकेच तिच्या चेहऱ्यावरचे पांघरून काढून पाहिले. ती नव्हती. मी आणखीन पांघरून उघडले. तिथे जड पांघरुणाशिवाय ती नव्हतीच. आज सूर्य कुठून उगवला? वीणा इतक्या पहाटे उठली! यानिमित्ताने तिला शाब्बासकी द्यायला हवी. तिला शाबासकी देण्यासाठी खिडकीतून खालील अंगणात पहिले. अंगणात तिच्या बाबांशिवाय कोणीही दिसले नाही.
'अहो! अहो! वीणा आज फारच लवकर उठली हो! ती खाली असेन तर माझ्याकडून शाब्बासकी द्या!'
ते हसले आणि हसतच म्हणाले, 'हे तर चांगलं आहे. पण ती इथे नाही आहे. तिथेच लपून बसली असेल तिला मोबाईल नाही दिला म्हणून.'
आम्ही तिला मोबाईल घेऊन देणार होतो. परंतु हे तिच्यासाठी गुपित होत. वीणाची ही जुनी सवय होती. तिला कधीही राग आल्यावर ती खालच्या खोलीच्या कोपऱ्यात लपून बसायची. मग मी तिच्यावर चिडणार आणि हे तिची आणि माझी समजूत घालणार. तो एक भाग आमच्या कुटुंबाला फार आवडायचा. मी हसतच तिला शोधू लागले. 'वीणा, ही काय वेळ आहे का तुझे रुसवे काढायला? आधीच थन्डी भरपूर आहे. ये बघू बाहेर!' मी त्या जागेवर गेले; परंतु ती तिथे नव्हती. माझ्या मनात अगदीच धस्स झाले. इतक्या पहाटे ही मुलगी कुठे गेली असावी? मी घाबरून ह्यांना हाक मारली.
VOUS LISEZ
24 - आठवणीतील तास
Mystère / Thrillerवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...