09. सकाळचे 11

40 2 0
                                    

ते शस्त्र अगदीच उघड्यावर पडले होते आणि मावशीची नजर माझ्या मागे होती. अनुज कडून दार उघडले जाताच मी ते शस्त्र पायानेच दाराकडे ढकलले. मावशीचे लक्ष नव्हते तितक्यात त्याने सुद्धा ते उचलले आणि स्वतःच्या खिश्यात टाकले. मावशी चा शोध पूर्ण होताच मी सुटकेचा निश्वास टाकला. अगदीच सुंदर केशरचना होत होती. त्या सुंदर केशरचनेला निहारण्याशिवाय मी त्याला बिगडवायचे कसे हा विचार करत होते. विचार वाढतच जात होते. केशरचना सुंदर होताच माझा चेहरा सुद्धा पूर्वीसारखाच किंबहुना त्याहूनही अधिक सुंदर झाला होता. फक्त ओठांना लाल भडक रंग लावला गेला होता. जो मला राहून राहून अजिबात आवडत नव्हता. सर्व तयारी पूर्ण होताच मावशी काही वेळ माझ्याकडे बघत राहिली. माझी ज्याप्रमाणे सुंदर होण्याची तयारी पूर्ण होत होती त्याप्रमाणेच अनुजच्या कपाळावर रेषा वाढत होत्या. माझी एक नजर त्याच्याकडे होतीच. माझ्याकडे मन भरून बघून झाल्यावर मावशीने अनुजला विचारले, 'आणखीन किती वेळ?'

दोघींचीही नजर दुर्लक्षित करत त्याने उत्तर दिले, 'त्यांना थोडा उशीर होणार आहे. तसंही ते सर्व प्रथम इथे येणार नाही.' अनुज आणि मी एक वेगळ्याच विचारात चिंतलो होतो. ज्याची मावशीला खबर सुद्धा नसावी का? ती वेळ सतत जवळ येत होती.

'हो ते सुद्धा आहेच. मग वीणा. तू लवकरच हिरोईन बनणार. खूप पैसे कमावणार. या मावशीला आणि तुझ्या गरीब मित्राला विसरून तर जाणार नाही ना?' या दोघांनाही कसे विसरायचे! कोणाच्याही नशिबी नको असा अनुभव! मन तर करत होतं की अनुज च्या खिश्यात असलेले शस्त्र घ्यावे आणि या ढोंगी स्त्रीच्या गळ्यात मारावे. परंतु अनुजने आधीच सांगितल्याप्रमाणे या खोलीपर्यंत सुरक्षा खूप होती. सर्व स्त्रिया आणि अनुजही मला जिवंत सोडणार नाही. मोठ्या मुश्कीलने मी माझा राग गिळला. वातावरणातली उपस्थित असलेल्या माझ्या शांततेला भेदत मी विचारले,  'मी इथेच राहून हिरोईन बनू शकणार का?'

मावशी पुन्हा हसत म्हणाल्या, 'नाही. हिरोईन या छोट्या गावात राहून कसं बनू शकणार? आज काही लोक येणार आहेत. तुला बघायला. त्यांच्यासमोर तू अगदी सुंदर बनून रहा. एखाद्या अप्सरेसारखीच. त्यांना मोहात पाड. मग ते तुला शूटिंग च्या ठिकाणी घेऊन जातील. तिथे फक्त तुला ते सांगतील ते काम करायला लागेन.'

24 - आठवणीतील तासOnde histórias criam vida. Descubra agora