13. दुपारचे 3

48 1 0
                                    

 दुपारचे 3

(वीणाच्या आईकडील परिस्थिती)

रेल्वे स्थानकावर सकाळपासून ही माझी दुसरी फेरी असावी. कारणही तेच होते. वीणाला शोधायचे होते. तिथे वाट बघत उभे राहून काही काळच झाला होता की माझ्या मनात विचित्र भाव निर्माण होऊ लागले. लोकांच्या माझ्यावर नजर रोखत होत्या. काही जण माझ्या फक्त चेहऱ्याकडे बघत होते तर काही लोक माझ्या चेहऱ्यावरून आणि हावभावावरून माझे मन वाचण्याचा प्रयत्न करत होते. मी कोण असावी? इथे का उभी होते? अशी एकटी बाई अश्या ठिकाणी का उभी असावी? सर्व विचार आले असावे. कधी वीणाचे काका येतात कोणास ठाऊक! वीणाच्या बाबांना समजलं तर? पुन्हा तोच धिंगाणा! इतकी भीती मनाला वाटूनही मी तिथेच थांबले होते.

काही मिनिटाने संयम आणि वीणाचे काका तिथे आले. त्यांना पाहून माझ्या मनाला पहिल्यांदा खूपच बरे वाटले. इशारा करून त्यांनी मला एका हॉटेल कडे येण्यास सांगितले. मी तिथे जाताच दोघांनीही माझ्यासाठी बसण्यास जागा केली. आमच्या गोष्टी ऐकणारे कोणीही नसावे. 'पुढे काय?' वीणाचे काका म्हणाले. आम्ही काही पुढे बोलणार तितक्यात संयम जागा सोडून हॉटेल बाहेर गेला. मी त्याच्याकडे बघतच राहिले. त्याने पाणी बॉटल घेऊन रस्त्यावरील एका गरजूला देऊ केली. या मुलाचा हात मदतीसाठी नेहमी पुढे असतो. मी विचार करू लागले. तो पुन्हा ऑटो मध्ये येऊन मला चॉकलेट देऊ लागला. 'संयम, बाळा तूच मला फोन केला होता का? तुला खरंच ती दिसलेली का?'

'होय, मी अगदी पहाटे उठलो होतो. तसं तर सकाळी पक्ष्यांसोबत संगीताचा रियाज करता यावा म्हणून मी पहाटे बाहेर निघतो. परंतु मी बाहेर निघून पाहतो तर काय, वीणा कानाला हात लावून माझ्या घरापासून अगदीच दुरून निघण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला मला तिचा राग आला; नन्तर थोडे आश्चर्य वाटले. जगात असंही कोणी असू शकते का ज्याला संगीत नाही आवडत? ते सुद्धा पदवीधर गायकाचे संगीत? हं! आश्चर्य तर हे की ती इतक्या पहाटे चालली होती. सूर्योदय सुद्धा झाला नव्हता. आमच्या इथे इतक्या सकाळी माझ्याशिवाय कोणीही उठत नसावे. पण नन्तर मला त्या स्त्रिया दिसल्या. त्या..'

24 - आठवणीतील तासNơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ