06. सकाळचे 8

59 2 0
                                    

सकाळचे 8

(आईच्या नजरेतून पुढील कहाणी)

इतका वेळ आम्ही तिला कुठे कुठे नाही शोधले असावे. तिची काळजी अधिकच वाढत होती. पण तिच्या बाबांना अजूनही त्यांची इज्जत प्यारी होती. कोणालाही आमची मुलगी कुठेतरी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले नव्हते. स्वतःची तरुण वयात आलेली मुलगी अचानक घर सोडून निघून जाते तेव्हा कसं वाटत असावं हे त्यांना काय समजणार. माझी मुलगी सरळ चिट्ठी लिहून घर सोडून गेली होती. याला मवाळ समाज 'पळून जाणे' असेच म्हणणार. एकदा पळून गेलेली मुलगी इज्जतीसह घरी परतते का? ती तिच्या प्रियकरासोबत नसून एकटीच आहे या गोष्टीला सकारात्मक पाहायचे की नकारात्मक? पोलीस स्थानकात एका चिट्ठीवरून तर पोलीस अधिकाऱ्याने नको नको ते अंदाज बांधले होते.

'नक्की तिचा एकच प्रियकर होता का?'

'ती कोणा दुसऱ्यासोबत तर नसेन ना?'

'प्रियेश नेच तिला लपवले असेल का?'

बापरे! नको नको ते प्रश्न. पोलीस आणि वीणाचे बाबा प्रियेशच्या घरी जाऊन चौकशी करणार होते. पोहोचले असतील आतापर्यंत ते. काहीतरी हाती लागले असेल का? अजून कोणाला फोन करून विचारायचे का? मी खिडकीत एक टक लावून वाट बघत बसले असताना वीणाचे बाबा आले. आज त्यांचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता. अगदीच खाली मान घालून ते वेड्यासारखे तिला शोधत होते. त्यांच्या मनात फक्त 2 गोष्टी होत्या. 1 म्हणजे आपली मुलगी आणि त्याहूनही अधिक. आपली इज्जत. मी मात्र अपेक्षेने त्यांच्याकडे पाहू लागले. 'अहो! काही समजले का? कुठे आहे आपली मुलगी?' काही वेळ तर ते शांत राहिले. त्यांच्या अश्या शांत राहण्यालाच मी नकार समजला होता. ती भयाण शांतता सर्वच प्रश्नांचे कटू उत्तरं देत होती. त्या शांततेला भेदत त्यांनी आणखीन भेदक निर्णय घेतला.

'आपली इज्जत तर गेली, आता मुलीला शोधून काय करणार? सोड तिचा विचार.'

त्यांचा हा निर्णय कोणत्याही आईला न ऐकवणारा होता. कधीही अनुभव न व्हावा असा होता. माझ्यासाठी त्यावेळी इज्जतीपेक्षाही माझी मुलगी प्रिय होती. कोणत्याही काळात कोणतीही आई हा निर्णय सहजासहजी मान्य करणारी नव्हती. मग मी तर 2012 मधील आई होती.

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now