05. सकाळचे 7

85 2 0
                                    


(आईच्या नजरेतून पुढील दृश्य)

'शहाण्याने कोर्टाची आणि पोलिसांची पायरी कधीच चढू नये!' आईकडून, सिनेमातून आणि स्वतःच्या नवऱ्याकडून ऐकत आलेली म्हण अजूनही माझ्या कानात भुणभुणत होती. आतापर्यंत किती साधं सोपं आयुष्य चाललेलं माझं. अगदीच; स्वच्छ होतं आमचं आयुष्य. शेवटी आमच्या मुलीने आम्हाला हे दिवसही दाखवले. वीणाचे बाबा समोर आणि मी त्यांच्या मागे मागे. त्यांच्याही मनात अनेक विचार येत असतील. ज्याप्रमाणे स्त्रीच मन कळणं या पुरुषांसाठी कठीण असतं तसंच पुरुषांचं मन कळण्याची तितकी जबाबदारी बुद्धी आम्हा स्त्रियांमध्ये नसतेच. एक वेळेला त्यांना माझी स्थिती, स्वतःची लाडकी मुलगी इथे नसण्याची मनस्थिती, हा समाज आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुलींची सुरक्षितता सांभाळायची होती.

म्हणूनच अगदी सक्ख्या भावालाही न सांगता माझं ऐकून ते सरळ पोलीस स्थानकात आले. दाराबाहेरच प्रवेश करावा की नाही हा प्रश्न आम्ही नजरेनेच एकमेकांना विचारला. फक्त वीणाचे नाव घेऊन आम्ही एकमेकांना सम्मती दिली. ते पोलीस स्थानक अगदीच छोटे होते. एकच हवालदार तिथे साखर झोपेत दिसला. समोर असलेला फोन सतत वाजत होता. ज्याच्या त्याच्यावर जराही परिणाम होत नव्हता. समोरच्या घड्याळीत सात वाजून वीस मिनिट झाले होते. आमचे सुद्धा त्याला उठवण्याचे प्रयत्न फसत चालले होते. तरीही अश्रू पुसत मी हंबरडा फोडत आणि वीणाच्या बाबांनी त्यांना हलवत उठवण्याच्या प्रयत्न केला. अगदीच चिडचिड करत तो उठला देखील. त्यांना दोन तीन मिनिट झोप उघडण्यातच गेले. झोप उडाल्यावर ते स्वतःशीच पुटपुटले, 'रोजचच झालं आहे. सकाळी सकाळी एक ना एक स्त्री तिचा रडका चेहरा घेऊन येणारच! अख्खा दिवस वाईट जातो.!'

चेहऱ्यावरील कंटाळवाणे भाव तसेच ठेवत तो यांना म्हणाला, 'बोला, मी तुमची कशी मदत करू शकतो?' 

यांनी स्वतःच्या 2.5 पिक्सेल वाल्या फोन मधून वीणाचा फोटो काढून त्यांना दाखवत म्हणाले, 'माझी मुलगी वीणा, ही सकाळपासून घरी नाही. कृपया करून तिला शोधा.'

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now