07. सकाळचे 9

48 2 0
                                    

एक मोठी शांत हवेली. आमच्या घराहुनही दुप्पट! न मोजता येण्याइतक्या खोल्या! जिथून तिथून खिडक्या. आणि... त्या खिडक्यांतून कबुतरांचे आवाज. आणखीन एक त्याची विशेषतः होती. ती म्हणजे शांतता. आमच्या शिवाय कोणीही नसावे का तिथे? तिथे आमचे आवाज कबुतरांच्या आवाजांसोबत घुमायचे. ऐकण्यास मस्करी वाटायची. पण गमतीशीर होते ते. एखाद्या शाळेच्या वर्गाप्रमाणे त्याच्या भिंतीचे पिवळे पिवळे रंग. हवेशीर हवेलीचा प्रकाशमय सहवास माझ्या मनाला अधिकच आवडू लागले.

मी पुन्हा त्याच्या सोबतचे स्वप्न पाहू लागले. अनुज दिसायला चांगला होता. त्याच्या चेहऱ्यावर तरुणपणाचे तेज होते. डोळे बोलके होते परंतु ते प्रेम आणि दुःखद प्रेमाशिवाय काहीही बोलू शकत नव्हते. त्याच्या प्रेमळ बोलक्या डोळ्यांप्रमाणे मात्र तो नव्हता. तो मला नेहमीच गोंधळला आणि कधी काय करेल याचा नेम नसणारा वाटायचा. त्याने पायाखाली लपवलेले धारदार शस्त्र मी अजूनही विसरले नव्हते. ते शस्त्र केव्हा हवेलीच्या दाराकडे आले हे देखील मला कळले नाही. त्याच्या प्रेमळ आणि तेजस्वी चेहऱ्यावर भुलून चालणार नव्हते. खरं सांगायचं तर तिथे प्रेमाचा पगडा जोर धरत होता. त्यावेळी ते शस्त्र माझ्या मनात अजूनही नाचत होते. तरीही मी प्रेमाखातर ते दुर्लक्षित केले. मी त्या हवेलीतील एक एक खोलीकडे पाहता पाहता मला तिथे एक स्त्री माझ्याकडे निरखून पाहताना दिसली. डोळ्याची पापणीही न लावता ती माझ्याकडे निरखून पाहत होती. चेहऱ्यावर कसलीतरी खुन्नस असावी. तिचे वर्णन करणे माझ्यासाठी थोडे कठीण होते. तिचे वय माझ्या आईपेक्षा दुप्पट असावे. म्हणजे ती 55 ते 60 च्या मध्ये असावी. तिचे डोळे मोठे आणि भयंकर रागाने तापलेले होते. तिचे केस अधून मधून पांढरे किंवा काही ठिकाणी तर नव्हतेच. तिच्या त्या भयंकर तापलेल्या डोळ्यात खचखचून काजळ भरलेले होते. माथ्यावर हळदी कुंकू थापलेले होते. अगदीच माथा भरला नव्हता. परंतु ते कुंकू नाक लाल करे पर्यंत भरलेले होते. ती अधून मधून तिच्या गुंफलेल्या वेणीला सोडायची किंवा मधूनच पुन्हा बांधायची. मी तिला पाहण्यात इतके गुंतले होते कि कधी माझ्या अंगावर शहारा भरला माझे मलाच समजले नाही. ती मला पाहत होती परंतु ती मधेच किंचाळली. किंचाळून ती म्हणाली, 'ए साकेत, तिला इथे आन. मला अशीच मुलगी हवी आहे. आज माझ्या धनाची रक्षा करूनच मी हा वाडा सोडेन.' तिची किंचाळी ऐकून मी खूप घाबरले. तिथेच रडू लागले. मला तिथे राहायचेच नव्हते. मी हे काय पाहिले आणि काय ऐकले! पहिल्यांदा मला आईची आठवण झाली. मी थरथरू लागले. परंतु मी आणखीन घाबरण्याच्या आत मला अनुज ने खेचले आणि अगदीच पाठच्या खोलीत नेले. जितका बाहेर उजेड होता तितकाच त्या खोलीत अंधार होता. एक बल्ब डिम मध्ये जळत होता ज्याचा फक्त त्या व्यासापर्यंतच उजेड पडत असावा. तिथे कोणत्याही कबुतरांचा आवाज नव्हता. कारण तिथे सम्पूर्ण गोंधळ त्या घड्याळ्याच्या काट्यांचा होता. त्या घड्याळाच्या काट्यामुळे कोणताही आवाज आत येत नव्हता. मी तर असेही घाबरतच आत शिरले होते. इथे आणखीन काळोख बघून मी अधिक घाबरले. तिथे मला एका स्त्रीचा कोमल आवाज आला. अगदीच नाजुकश्या आवाजात तिने तक्रार केली, 'पुन्हा सकाळी सकाळी तू माझी झोप मोडली. आज तरी काम झालं का?' कोणत्यातरी काठीचा आवाज करत तिने एक खिडकी खोलली. खिडकी खोलताच त्या खोलीत लक्ख प्रकाश पडला. त्या खोलीत एक खाट आणि पाण्याच्या मडक्याशिवाय काहीही नव्हते. खोलीच्या प्रकाशाचा आस्वाद घेतल्यावर मी त्या स्त्री कडे पाहिले. तिच्या आवाजाप्रमाणे ती काही दिसायला नाजूक नव्हती. परंतु तिच्या चेहऱ्यावर प्रचंड ममता होती. चेहऱ्याची विशेष काळजी घेतल्याचे वाटत होते. कारण खाटेच्या शेजारीच एक दगड आणि त्या बाजूला सुंदर त्वचेसाठी सर्व घरगुती उपाय करणारी सामग्री होती. मुलतानी माती पासून ते अगदीच दुर्मिळ केसरापर्यंत. एका अदृश्य रंगाच्या डब्बीमध्ये कसलातरीच गर सुद्धा होता. त्याचाच परिणाम म्हणून तिचे इतके वय असूनही चेहऱ्यावर कोवळ्या तरुणीचे तेज पसरले होते. सध्याचे तर सोडूनच द्या पण तरुणपणी सुद्धा तिला मुरूम आला नसावा. नक्कीच इतके असूनही ती सुंदर दिसत नव्हती. पण तिच्या कडे बघून मला ती प्रचंड दयाळू आणि ममतेची मूर्ती असणारी महिला वाटली. आमची भेट होताच ती सुद्धा माझ्याकडे एकटक पाहत राहिली. आमच्या सुंदरतेचे आम्हीच नजरेने स्तुती करत असताना अनुज ओळख करून देत म्हणाला, 'वीणा, ही माझी मावशी. मावशी ही तीच माझी प्रिय मैत्रीण वीणा.' ओळख करून देताना पुन्हा खटकणारी गोष्ट म्हणजे तो काहीतरी पुटपुटला पण ते मला ऐकू सुद्धा आले नाही आणि मला समजले सुद्धा नाही. पुटपुटत असताना त्याने हसत काही इशारे सुद्धा केले. कदाचित मी त्याची अधिकच प्रिय मैत्रीण आहे हेच तो सांगत असणार. त्याच्या मावशीने अगदीच प्रेमाने माझा हात धरला, 'वीणा, किती सुंदर आहे तू! एखाद्या परीसारखी नाही तर एखाद्या अप्सरेसारखी. इतक्या सुंदर मुली या जगात असतात का या प्रश्नाचे आज मला उत्तर मिळाले.'

24 - आठवणीतील तासWhere stories live. Discover now