14. दुपारचे 4

45 1 0
                                    

दुपारचे 4

(वीणाच्या आईच्या नजरेतून)

रस्त्याभर रक्त पसरले होते. जणू काही ते रक्त कोणाच्यातरी दक्षतेची वाट पाहत होते. मी एकटीच कुंपणाच्या अलीकडे होते. अजूनही ते दोघे पलीकडे होते. संयम माझी किंचाळी ऐकताच कुंपण पार करण्याचे प्रयत्न करू लागला. काटेरी कुंपणामुळे तो पार करू शकला नाही. मी कोणाचीही वाट न पाहताच रक्ताची भीती दुर्लक्षित करून चालू लागले. त्या रक्ताचा पाठलाग करू लागले. कोणाची शेती तर नसावी तिथे पण मोकळे मैदान होते. त्यावर एक वाट काढल्यासारखी गवत तुडवलेली वाट होती. मंद मंद उन अजूनही त्या गवंतांवर चमकत होते. रक्त हळू हळू सुकले होते तरीही ते दिसत होते. स्वतःच्याच धुंदीत मी एकटीच चालत असताना मला वीणाच्या काकांनी हाक मारली. त्या बाजूला कुंपण थोडे तुटलेले होते. कोणीही आरामात तिथून इथे येऊ शकत होता. ते दोघेही तिथून अलीकडे आले. रक्त बघताच संयम च्या आधी वीणाचे काका म्हणाले, 'रक्ताचा पाठलाग करू या!' आंज्ञा दिल्यासारखे ते म्हणाले आणि आम्ही दोघेही त्यांची आज्ञा पाळू लागलो. ते पुढे मी मागे. माझ्या काळजीपोटी संयम माझ्या पाठीशी चालत होता. चालता चालता शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथून हे रक्त सांडत होते. एका मुक्या जन्गली जनावराचे रक्त होते ते. परंतु त्याच्या भोवती पोलिसांची रेखा आखली होती. त्या पांढऱ्या लाल पोलिसांच्या पट्ट्या तिथे जागो जागी बांधल्या होत्या. त्या पट्ट्या बघताच माझ्या मनात शन्केची पाल चुकचुकली. इथे नक्कीच काहीतरी घडले आहे. जन्गली जनावरांसाठी पोलीस अश्या पट्ट्या लावणार नाही. मला आता कशातही अडकायचे नव्हते.
मी आणि संयम तिथे कसलेही पाऊल न सोडता बाजूबाजूने जाण्याचा प्रयत्न करत होतो पण वीणाच्या काकांनी नेमका तोच रस्ता धरायला सांगितले. त्या पट्ट्या एका हाताने खेचत ते म्हणाले, 'संयम, इथून चल.' असं म्हणताच त्याच्या डोळ्यासमोर भीती उभी राहिली. अश्या ठिकाणाहूनच आपण का जायचे? चेहऱ्यावर भीती सुद्धा दिसत होती. आपण का हा धोका पत्करायचा? विचार माझ्याही मनात आला. पण पुढाकार घेतलेल्या वीणाच्या काकांना मी हा प्रश्न विचारू शकत नव्हते. त्यांना टाळत मी म्हणाले, 'आपण त्या रस्त्यापेक्षा असं बाजूबाजूने जाऊ या.' 'हो चालेल.' संयमचे चटकन उत्तर आले. त्याने उत्तर देताच आम्ही दोघेही त्या रस्त्याने चालू लागलो. वीणाचे काका अजूनही तिथेच उभे होते. एका हातात त्या पट्ट्या घेऊन आणि दुसऱ्या हाताने त्यांची बॅग एका बाजूला सरकवून.

24 - आठवणीतील तासDonde viven las historias. Descúbrelo ahora