मध्यरात्री 12
'इथे कोणीतरी आहे!' आवाज ऐकू आला? कोणीतरी शस्त्र हातात घेऊन मला शोधत होता . तितक्यात त्याचा सोबती घाई गडबडीने आला आणि म्हणाला, 'अरे चल ना! कोणी पकडेल आपल्याला.' मी डोळे उघडून मिचमिचल्या डोळ्याने त्याला पाहू लागले. त्याच्या हातात चमकती वस्तू होती. खिशातले पैसे असेच अजाणतेने पडत होते. त्याकडे त्याने जाणून दुर्लक्ष केले. त्याला फक्त तिथून निघायचे होते. तो स्वतः पुढे गेला आणि त्या चोराला सुद्धा सोबत येण्यास सांगू लागला. पण त्याला मी दिसले.
'थांब! ही बघ!' तो माझी नजर पाहताच घाबरला. मी कसलेही उत्तर दिले नाही. अनावधानाने माझ्या तोंडून निघाले, 'मदत! मदत करा.' शस्त्र घेऊन तो माझ्या कडे आला. 'रक्त बघ!' तो म्हणाला. 'अरे चल ना! कोणी पकडेल आपल्याला. तीच काय ते ती बघून घेईल. रक्त बघ आणखीन तिच्यामुळे फसायचं नाही आहे.' असं म्हणत त्याच्या सवंगड्याने त्याला उठवले. ते दोघेही तिथून निघाले. मी सुटकेचा निश्वास घेतला.
मला पुन्हा वेदना जाणवू लागल्या. माझ्या पायावर कोणी तरी पाय ठेऊन दाबत असावे. मी विव्हळले. पाठी वळून पाहताच मला पुन्हा तोच मुलगा दिसला. 'ओय हे आता आम्ही दिसलो ते तोंड उघडायचं नाय हं कुठे! नाहीतर यानेच तुझा गळा कापू.' त्या मुलाने स्वतःचा चेहरा बांधला होता. त्याचे सोनेरी केस चमकत होते.
'नाही सांगणार!' मी विव्हळत म्हणाले. त्याने पाय काढताच मी पुन्हा म्हणाले, 'मदत! मदत करा.' त्याने माझ्या पायाला जोरदार लाथ मारली. 'तुझ्यावर विश्वास नाय!' असं म्हणून तो मला छळू लागला. मला पायाने मारू लागला. मी विव्हळत होते. त्याने मला मारणे चालूच ठेवले.
तितक्यात मला एक आवाज ऐकू आला. ओळखीचा आवाज! 'वीणा!' मला कोणी हाक मारली असावी? तो आवाज ओळखायला मला एक क्षण सुद्धा लागला नाही. 'प्रियेश!' मी पुन्हा पुटपुटले. त्याचा आवाज ऐकताच तो चोर पळाला. मी अजूनही कण्हकण्हत जमिनीवर नाक रगडत होते. त्या कचऱ्यात माझ्या केसावर काय आहे किंवा माझा पाय कश्यात फसला आहे किंवा तिथे असहनीय दुर्गन्ध येत होता. मला काहीही जाणून घ्यायचे नव्हते. ते जाताच त्याने माझ्या खांद्याला धरून मला उठवण्याचा प्रयत्न केला. मला पाहून त्याला आश्चर्याने आनंद झाला होता. माझ्या गुढघ्याला खरचटले होते. मी रडत रडत कसेतरी बसले. 'वीणा, तू इथे काय करते? लागलं आहे तुझ्या पायाला.' तो काळजीने विचारपूस करू लागला. मी फक्त रडत होते. त्याला पाहून मला प्रचंड आनंद व्हायला हवा होता. शेवटी माझ्या ओळखीचे मला वाचवणारे कोणीतरी मला भेटले होते. परंतु मला तसा आनंद झाला नाही. त्याच्यामुळेच मी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आताच्या परिस्थितीला पूर्णपणे तो जबाबदार नाही का? घरी अजूनही ती चिठ्ठी पडली असावी.
ESTÁS LEYENDO
24 - आठवणीतील तास
Misterio / Suspensoवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...