दुपारचे 1
तरी थोडी काही शुद्धता माझ्यात होती. त्यावेळी फक्त स्वतःचा असा आवाज किंवा स्वतःची मते नव्हती. मी त्या सर्वांकडे एकटक पाहत होते. तिथे त्यांनी माझीच पूजा केली होती. माझ्या कपाळाला तर्हेतर्हेचे पदार्थ लावलेले होते. लिंबू, चाकू काही छोट्याश्या लाकडी काठ्या, कसलीतरी माती, त्यावर काजळ, तर्हेतर्हेचे तिथे दुर्मिळ प्राणी होते ज्यापासून मला काहीही फरक पडत नव्हता. महत्वाचं म्हणजे रक्त सुद्धा लाकडी काठ्यांवर पडलेलं होतं. ते माझ्यावर कसले तरी विधी करत होते. परंतु तिथे अनुज आला. अनुज येताच हा प्रकार पाहून खूप घाबरला. त्याने माझा हात धरला. मी काही जागेवरून हलत नव्हते. तिथंचे हार वगरे गळ्याभोवती गुंडाळून बसले होते.
'तिच्यावर प्रक्रिया चालू आहे.'
'ती इथे राहणारी नाही आहे. तुम्ही प्रक्रिया कसली केली. तिला लवकर मुक्त करा.' त्याला हात दाखवत ती माझ्यासोबत असलेली तरुणी म्हणाली, 'प्रक्रिया तिने विघ्न आणल्याशिवाय सोडता येत नाही.'
हे ऐकताच तो माझा हात जोरजोरात हलवू लागला. ज्याचा माझ्यावर आणि त्या तरुणींवर कसलाही परिणाम होत नव्हता. मी त्या जळत्या अग्नीकडे एकटक बघत होते. जिचा प्रकाश फक्त त्या अग्निपुरताच असावा. मंद प्रकाशाची आग. कसलाही उपयोग नसल्याप्रमाणे ती फक्त जळत होती. व्यर्थ आणि भयावह वाटेल अशी. त्याचेच अनेक गुपित मनात ठेवून सर्वकाही समजल्याप्रमाणे. 'फक्त आता तिने इथे पाणी टाकल्यावर हे धन आम्ही घेऊ शकू. वीणा, हे पाणी घे.' ती स्त्री अगदीच मोहकतेने म्हणाली. तिने हाक मारताच मी तिच्याकडे लक्ष देऊ लागले. पाणी घे म्हणताच मी माझा हात पुढे केला. ज्यावर पाणी सोडण्याआधीच ती तरुणी ओरडली. 'रक्त, विघ्न! उठ इथून.' असं बोलताच मी शुद्धीवर आले. 'काय झाले?' मी विचारले. मी हे विचारताच अनुज पुढे सरसावला आणि त्या तरुणीच्या कानाखाली मारण्याकरिता हात उचलले परंतु बाई जातीवर हात उचलू न शकण्याने तो तसाच माझा हात धरत तिथून चालू लागला.
पुन्हा आमच्यात शांतता आणि हातात हात घालून नव्हे तर खेचून चालणे चालू झाले. गल्लीवर गल्ली. त्यात कसले कसले प्रकार. तर्हे तर्हेचे लोक. काही चेहऱ्याने विचित्र तर काही पेहरावाने तर काही वागण्याने विचित्र. कोणाची ना कोणाची नजर माझ्यावर पडल्याशिवाय राहायची नाही. तिथून निघण्याआधीच मी तो गळ्यातला हार फेकून दिला. माझ्या माथ्यावर अजूनही ते कुंकू आणि तर्हे तर्हेचे पदार्थ लावले होते. त्यात काजळही शामिल होते. काही वेळेआधीच अति सुंदर दिसणारी वीणा आता भयानक आणि विचित्र दिसत असावी याचे तिला जराही भान राहिले नाही. ज्याप्रमाणे हवेचा एक झोका मिळेल त्या दिशेने वाहत जातो त्याप्रमाणेच मी सुद्धा त्याचा हात धरून जात होते. शेवटी आम्ही एका गल्लीत आलो. जिथे आमच्याकडे बघणारे कोणीही नव्हते. तेथील स्त्रिया सुद्धा साधारण होत्या. मुख्य म्हणजे तिथे लहान मुलं होती. आपल्या आईसोबत राहणारी लहान मुलं. दुसऱ्या मुलांसोबत डोंगर का पाणी खेळणारी मुलं होती. तिथे पोहोचताच त्याने माझा हात सोडला. पुन्हा तो विचित्र वागू लागला. अगदीच कडक आणि शांत वाटणारा अनुज त्या मुलांची खोड काढू लागला. त्यांना हाक मारू लागला. नक्कीच माझ्याकडे कोणीही यायला तयार नव्हते. तिथे काही लहान मुलीसुद्धा होत्या. अनुजचा त्या मुलींमध्ये अधिक जीव अडकलेला दिसत होता. त्या मुली येताच तो मला अगदी विसरून गेला. तिथेच एक त्यांची आई त्याच्यासोबत बोलू लागली. तिच्याशी बोलता बोलता त्याने हकीकत सांगितली. 'या मुलीला मी आताच तिथून वाचवले. पुन्हा बळी देण्यास तयार होते. पूजा झालीच होती फक्त स्वाहा बाकी होता. जर तो हिने केला असता तर हिचा सुद्धा जीव गेला असता. हाताला रक्त लागले होते कसले तरी त्यामुळे तिची पूजा अमान्य ठरली. जर ते रक्त नसतं तर?' तो आम्ही इथून कस सुटलं हे तिला सांगत राहिला आणि आम्ही ऐकत राहिलो. परंतु त्याच्या बोलण्यात आपुलकीचा भाव जाणवत नव्हता. जणू मी त्याची मैत्रीण किंवा त्याला आवडणारी मुलगी नसून अशीच एखादी संकटातून वाचवलेली मुलगी असावी.
YOU ARE READING
24 - आठवणीतील तास
Mystery / Thrillerवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...