मध्यरात्रीचे 2
(वीणाच्या आईच्या दृष्टीतून त्यांच्याकडील परिस्थिती)
यावेळी घरी परतताना आम्ही निराश झालो नव्हतो. मला माहित होते माझी मुलगी घरी परतेन. ती घरी आली कि तिला जाबच विचारणार आहे चांगला. तिची खरडपट्टी काढायला हवी. ती सुखरूप घरी पोहोचू दे आणि मधेच तीच मन हे पळून जायचं होऊ नये म्हणजे झालं. वीणा फारच चंचल स्वभावाची आहे. आज तिने काय काय पाहिले नसणार. जाऊ दे खरडपट्टी काढण्याचा आणि तिला जाब विचारण्याचा विचारच मी मनातून काढायला हवा. तिला तिचा धडा चांगलाच मिळाला असणार. जो आम्ही शिकवलेल्या कितीतरी शिकवण्यांपेक्षा मोठा असणार. तिला फक्त सुखरूप घरी येऊ दे. बस!
(वीणा कडील दृश्य)
तो रस्ता पार करताना माझ्या अंगाला थरकाप सुटला होता. माझ्यासोबत अनुज आहे का? त्याचा साथ कितीही हवासा वाटत असला तरी मृत्युंनतर नको होता. त्याचे माझ्यासोबत असणे भीतीदायक होते. 'अनुज, तू मला आतापर्यंत मदत केली होती. मला घरापर्यंत सुखरूप पोहोचवायचे होते. तसेच होऊ दे. कृपया करून मला घाबरवू नको. मी आता एकटीच स्वतःचा मार्ग काढेल .' मी मनातच त्याच्याकडे प्रार्थना करत होते. मी मन घट्ट केले. काहीही झाले; आज स्मशान जरी पार करावे लागले तरी ते करावे लागणार. कारण घरी जायची जिद्द अधिक मोठी होती. भीतीने नकळत अश्रू गालावर ओघळले.
जर आता प्रियेश माझ्यासोबत असता तर? मी अशी रडलीच नसते. ते प्रेम खोटे असले तरी आम्ही ते प्रेमाचं खोट नाटक तरी केले असते. प्रियेश माफ कर मला. 'आपले प्रेम होते' असे म्हणालो होतो आपण. खरंतर ते खोटे होते. मी स्वतःच्या सुंदरतेचा जगात हरवले होते. ज्यात मला भरपूर प्रेम भेटत होते. तुझ्याकडे लक्षच दिले नव्हते. माफ कर. मला माहीत होते माझे तुझ्यावर प्रेम नाही आहे. तरीही मी प्रेमाचे खोटे नाटक केले. गेले 1-2 वर्ष मी हे नाटक करत राहिले. खोटे प्रेम असूनही मी ते दाखवत गेले. म्हणून पुन्हा एकदा माफी मागते. तुला घर सोडून माझ्यासोबत पळून जाण्यास प्रवृत्त केले. म्हणून सुद्धा माफी मागते. आणि शेवटची माफी माझ्यामुळे तुला सर्वांनीच त्रास दिला म्हणून. मी सुद्धा शेवटी त्रासच दिला.
KAMU SEDANG MEMBACA
24 - आठवणीतील तास
Misteri / Thrillerवय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका...