рднрд╛рдЧ...рейреп

738 3 0
                                    

दिवाळीची सुट्टी लागली होती आणि मोना व मि गावी आलो होतो, मोना गावाकडे कायमच रमत असल्याने ति रोज आईला कामात मदत करत होती, हव नको ते पाहात होती, आईची व मोनाची गट्टी जमली होती,
मीही आबांनी सांगितलेली कामे करत होतो, व शक्य होईल तेवढी मदत करत होतो, रोज सकाळी दिवसभरात करावयाची कामे सांगुन आबा निघत होते, मोना आई व आबांना काय हवे ते सगळं पहात होती त्यामुळे वेगळच चैतन्य निर्माण झाले होते व दोघेही मनोमन खुप खुश होते.
गावी असल्याने मोना व मि अंतर राखून वागत होतो, व फक्त दोघेच असताना टिंगल टवाळी करत होतो. मोना मुद्दामच चिडवत होती.
आता कसं वाटतंय, नवरोबा,एकांतात असताना फारच त्रास देतो ना.
आता कसं छान वाटत मला विचारूच नको,
हो का मोना, हेही दिवस जातील ग,नंतर ...
मि मनोमन बेचैन होतो कारण रोजच्या मोनाच्या सहवासाची चटक लागली होती, दुरावा सहन होत नव्हता पण इलाज नव्हता. एकांत मिळवण्यासाठी धडपड करत होतो,
रोज सकाळी उठल्या नंतर शहरात जाऊन वेगवेगळी कामे मि करत होतो त्यामुळे आबांचाही भार हलका होत होता व माझाही वेळ कसा जातो ते कळत नव्हते पण रात्री बेचैन होत होतो, जेवण झाल्यावर मोना व मी रात्री शतपावलीसाठी बाहेर येत होतो तेवढाच मोनाचा सहवास घडू शकत होता.
दिवाळीला माझ्या दोन्ही मोठ्या विवाहित बहिणी गीतांजली व मिताली ताई व त्यांची मुलं प्राची, रोहित, वेदांत आले होते व घर भरल्या सारखे वाटत होते, ताईचा माझ्या वर अतोनात जिव होता, एकुलता एक मुलगा असल्याने आबा कायमच मला जिव लावत होते पण मिताली ताई मला अधिकच जपत होती व गिता ताईही मला नेहमी नीट वागणे, नीट रहा असा सल्ला प्रेमाने देत होती पण लग्न झाल्या नंतर दोघीही आबांना  नेहमी, ह्याला रागाऊ नका, असे बोलत असत,
पोरींनो तो तुमच्या पेक्षा समजुतदार आहे तशी वेळच येत नाही, आज्ञाधारक आहे, अभ्यास करतोय, हव तस वागतोय मी का रागाऊ असे बोलुन निरुत्तर करत
मोनाचा व दोघींचाही परिचय असल्याने व आई कायमच मोनाचे गुणगान गात असल्याने चौघीचीही छान गट्टी जमली होती, लहान भाचा वेदान्त चुणचुणीत आणि हुशार असल्याने मोनाची चौकशी करत होता,
आजी ह्या कोण आहेत.
मामाची टिचर आहे वेदांत मिताली ताई बोलली.
मम्मी टिचर स्कूल मध्ये असतात, मामा कडे मामीच असते, हो की नाही, मि मामीच बोलणार,
मोना लाजत होती, व ताई वेदांतला समजावत होती
असु दया हो ताई मला नाही राग येणार तसही लहान आहे राज माझ्या पेक्षा.
मग आम्ही सुध्दा तुला वहीनीच बोलणार. मुद्दामच ताई चिडवत होती. बघ रे भैया आम्हाला अशीच सुंदर, मनमिळाऊ, गोड वहीनी हवी आहे, हिही असली तरी चालेल, हो कि नाही ताई, अस बोलुन मलाही चिडवत.
काय ग पोरींनो का चिडवताय तिला, फारच गुणी आणि हुशार  आहे मोना
तुही असच बोलणार आई, आमच्या पेक्षा मोनाचेच नाव जास्त आहे तुझ्या तोंडात, आबाही कायमच मोना मोना करत असतात,जशी काय तुझीच सुन आहे मोनिका, आणि तु काय ग ताई ताई करत असते, नावानेच हाक मारत जा. मुलही आनंदी होती व मोनाला मामी मामी बोलुन आनंद घेत होती.
संध्याकाळी आम्ही सर्वजण जेवण करत होतो, ताई मोनाला वहीनी हे दे ते दे करत होती, आबा हसत होते,
चिडवा काय वाट्टेल ते आता तर मि जमीनही घेतली आहे तिच्या नावाने, हो ना सुनबाई.
काय, खरंच मिताली..
आमच्या पेक्षाही जिव लावतात आबा तुला वहीनी.
काय ग पोरींनो का चिडवताय तिला मग, आबा हसत होते
शक्य आहे का ते, याचा अभ्यास होईल त्यामुळे ठेवलय मि तिच्याकडे छान चाललाय अभ्यास त्याचा ऊगीचच चिडवत असता तुम्ही तिला .
टाईमपासकरतोय आबा आम्ही, तिलाही आवडतय,
गावी येऊन आठ दिवस झाले होते व मि मोनाच्या सहवासा साठी बेचैन होतो पण सगळे असल्याने शक्य नव्हते, सकाळी उठल्या नंतर मि मोनाला मळ्यात जाऊन येऊ बोलत होतो, मोना व मी मळ्यात जाऊन एकांत शोधत होतो पण तेथेही रामुकाकाची बायको असल्याने काही जमत नव्हते ,आडोशाला मोनाला ओढून घेत मि तिला मिठी मारली होती पण तेवढ्यात भैया दुध. अशी आरोळी ठोकत काकी बोलवत होती.
एवढा उतावीळ झालाय, दम नाही निघत वाटत मोना बोलली
हो का मग तुला काय वाटतं
मला करमत,
आहे सहनशीलता माझ्यात,
तुला करमत असेल पण तुझ्या छकुलीला,
तिही खुष आहे, मस्त आराम मिळाल्याने खुष आहे.
मोने सताऊ नको, नाही तर रात्री, तुझ्या शेजारी येऊन...
बघू या नवरोबा काही हरकत नाही किती डेअरींग आहे
अस काय ग मोना नाही राहवत मला, काही तरी कर ना.
काकुळतिने मी बोलत होतो.
मोनाही व्याकुळ होऊन मला बोलली, मलाही नाही करमणार पण काय करणार. करते काही तरी. दोन दिवसात
आम्ही दोघे घरी आलो होतो.
आबा निघाले होते,
भैया तलाठयाकडे जाऊन नोंदी साठी सह्या करायच्या आहेत, तु आज चौकशी करून ये कधी येणार आहेत भाऊसाहेब.
आबा गेल्या नंतर ताई विचारत होती
किती जमीन घेतली भैया वहीनीच्या नावावर
तस नाही गिता, नाही सांगता येत पण भैया, मि व निशीगंधा मिळुन दिडशे एकर घेतलीय, आबा, पप्पा व भोसले साहेब मिळुन. मोना बोलली.
मजा आहे ग तुमची. फारच जिव लावतात आबा तुला वहीनी  आतां आमच काही खर नाही..
काय ग काॅलेजला हा कुणामागे लागत नाही ना, अभ्यास करतोय का, लक्ष आहे का अभ्यासात, का फिरतोय मुलींमागे.
मि असताना काय हिम्मत आहे मिता, मोना बोलली
आतापासूनच धाकात ठेवते कि काय वहीनी आमच्या भावाला गिता टिंगल करत होती.
नाही ग शिक्षण महत्वाचं बाकी गोष्टी नंतर .
असच धाकात ठेव, मोना..ग्रॅजयुएट होऊ दे. ताई बोलली
दिवसभर सर्व कामं ऊरकुन मी संध्याकाळी घरी आलो होतो, व मि आबांना बोललो परवा येणार आहेत भाऊसाहेब
मग परवा जाऊन सह्या करून या तुम्ही, चालेल ना सुनबाई.
मला व मोनालाही तेच हवे होते, एकमेकांकडे पाहत आम्ही गालातल्या गालात हसत होतो, व मनोमन आनंदी होतो.
तिसर्या दिवशी मोना तयार झाली होती, हलकासा मेकअप, छान पिवळी सिफाॅनची साडी, व आकर्षक केशरचना, मोना अधिकच सुंदर व आकर्षक दिसत होती, मिही मॅचिंग ड्रेस घालून तयार होतो, मोनाला पाहून ताई चिडवत होती, शोभतोय बरका वहीनी जोडा, चालेल आम्हाला तु मोठी असली तरी..
काय मिता एकही संधी सोडत नाही, मोना हसत हसत बोलली. तेवढ्यात प्राची बोलली मामी मलाही ने ना ग.
मलाही यायचय तुमच्या बरोबर, मि येणारच बोलुन हट्ट करत होती...

क्रमशः...

ЁЯТЛрдкреНрд░рдгрдп рд╣рд╡рд╛ рд╣рд╡рд╛рд╕рд╛ ЁЯТЛWhere stories live. Discover now