साथ तुझी ... !
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे .. संदर्भ आढळल्यास योगायोग मानावा.)
भाग १ :
सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी तिच्या खोलीत खिडकीतून अलगद प्रवेश केला आणि थेट वाट काढत तिच्या चेहऱ्यावर येऊन रेंगाळू लागले . थोडेसे अलगद चेहऱ्यावर हसू आणून तिने तिचा चेहरा बेड वर हलकेच घुसळला . हात लांब पसरवून तिने मस्त आळस दिला आणि तिचे डोळे घड्याळयाच्या दिशेने फिरवले .
" अरे बापरे ! आज कॉलेजचा पहिलाच दिवस आहे . पहिल्याच दिवशी उशीर होतय बहुतेक पळा आता . "
बेड वरून पटकन उडी मारून ती धावत धावत बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली तितक्यात तिला एक कॉल आला . बाथरूमच्या दिशेने तिची पडणारी पावलं आता बेडच्या दिशेने पडू लागली .
" कोण आहे आता ? आधीच इथे उशीर झालाय कोण कडमडल देव जाणे ! "थोडी वैतागतच ती बेडजवळ गेली . आणि पटकन कॉल उचलला . फोनवरच नाव वाचताच ...
" सॉरी सॉरी , खरंच सॉरी ! मला फक्त पाच मिनिट दे पटकन अवरून येते . " असं म्हणून लगेच कॉल कट केला आणि पळत बाथरूम मध्ये शिरली .
ती पटापट आवरून हॉल मध्ये आली . हॉल मध्ये वातावरण जरा तापलेले होत . आणि ती येताच अजून जास्त तापलं ." या या महाराणी आलात ! "
थोडी घाबरतच ती डायनिंग टेबल जवळ येऊन उभा राहिला .
" काय विचारते मी ? " जरा कर्कश्य आवाजात तिची काकी तिला ओरडली .तशी दचकून ती दोन पावलं मागे गेली आणि थरथरायला लागली .
" ते .. ते . आ.. आज जरा ..उश.. उशीर झाला उठायला .उद्या.. पासून लवकर .. उ..उठत जाईल .."
" आणि उठून काय आमची तोंड बघत बसणार ? "
" ना .. नाही "
" सकाळी उठून सगळ आवरून , स्वयंपाक करून जायचं समजलं का ..? "
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..